संगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यातील तेऱ्ये गोपाळवाडी येथील ग्रामस्थांनी जनसंपर्क कार्यालय, सावर्डे येथे आमदार शेखर निकम यांची भेट घेवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजितदादा गट) पक्ष प्रवेश केला. आमदार शेखर निकम यांनी तेऱ्ये ग्रामस्थांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले व सर्वांशी संवाद साधला, गाव विकासाबाबत चर्चा केली. विकास निधीबाबत निश्चिंत राहून पक्ष वाढीच्या कामाला लागा, माझे प्रत्येक चांगल्या कामात आपणास सहकार्य असेल असा शब्द दिला.
प्रवेश कर्त्यांमध्ये चंद्रकांत गजबार, रमेश तावडे, संजय साबळे, बबन साबळे, नागेश साबळे, मंगेश साबळे, हर्षद साबळे, अनंत गजबार, अनिल साबळे, विलास साबळे, सचिन गजबार, किरण जाधव, दीक्षा साबळे, निशा साबळे, बबन जाधव, गीता साबळे, संतोष साबळे, तात्या साबळे, भिकाजी साबळे, साक्षी साबळे यांचा समावेश आहे. यावेळी अजय साबळे, गणपत चव्हाण, मुरादपूरचे माजी सरपंच मंगेश बंडागळे, हुसेन बोबडे, रामू पंदेरे, विजय भुवड आदि पदाधिकारी उपस्थित होते.