देवधामापूर सप्रेवाडीतील शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश.

Spread the love

संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष अभिजित सप्रे यांचे विशेष प्रयत्न…

महाराष्ट्र प्रवक्ता न्यूज | देवरुख | ऑक्टोबर ०५, २०२३.

संगमेश्वर तालुक्यातील देवधामापुर सप्रे वाडीतील उबाठा गटाच्या सुमारे ४० तरुण कार्यकर्त्यांनी आज संगमेश्वर-चिपळूण विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव यांच्या प्रमुख उपस्थितीतीत भाजपामध्ये प्रवेश केला.

मागील अनेक वर्ष शिवसेनेसोबत राहूनदेखील गावचा अपेक्षित विकास झाला नाही; सध्या देशात भाजपशिवाय पर्याय नाही हे वेगवेगळ्या पातळ्यांवर वारंवार सिद्ध होत आहे. त्यामुळे गावच्या विकासासाठी आम्ही भाजपा मध्ये प्रवेश करत असल्याचे सर्व कार्यकर्त्यांनी सांगितले.

हा पक्षप्रवेश व्हावायासाठी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष श्री. अभिजित सप्रे यांनी विशेष प्रयत्न केले. दशक्रोशीत उत्तम लोकसंग्रह असणाऱ्या श्री. अभिजित सप्रे यांच्याकडून यापुढेही भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ कायम राहिल असा विश्वास संगमेश्वर-चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख, भाजपा नेते श्री. प्रमोद अधटराव यांनी व्यक्त केला. गावच्या विकासकामांसाठी आपण स्वत: लक्ष घालू; आपण दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू असे आश्वासन यानिमित्ताने त्यांनी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिले.

याप्रसंगी श्री. प्रमोद अधटराव, जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव, संगमेश्वर (दक्षिण) तालुकाध्यक्ष श्री. रुपेश कदम, जिल्हा उपाध्यक्ष श्री. निलेश भुरवणे, तालुका उपाध्यक्ष विजय गुरव, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष श्री. शुभम पांचाळ, जिल्हा सोशल मिडिया संयोजक श्री. अमोल गायकर, जिल्हा कार्यकारीणी सदस्य श्री. सुधीर यशवंतराव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवेश करणारे कार्यकर्ते…

श्री. गणेश माईन, श्री. नरेश माईन, श्री. राकेश माईन, श्री. शैलेश माईन, श्री. दिनेश माईन, श्री. संदेश माईन, श्री. रविराज माईन, श्री. विकास माईन, श्री. अजित माईन, श्री. स्वप्नील माईन, श्री. शशिकांत माईन, श्री. संतोष माईन, श्री. निलेश बाईत, श्री. प्रदिप बाईत, श्री. ऋत्वीक बाईत, श्री. योगेश बाईत, श्री. महेश मांडवे, श्री. मंगेश मांडवे, श्री. जयेश मांडवे, श्री. अजित मांडवे, श्री. अमित मांडवे, श्री. आत्माराम माईन, श्री. शुभम माईन, श्री. दिपक माईन, श्री. निलेश बाईत, श्री. प्रविण बाईत, श्री. रोहित बाईत, श्री. सचिन माईन, श्री. प्रदिप माईन, श्री. तेजस बाईत, श्री. प्रणव मांडवे, श्री. योगेश बाईत, श्री. वैभव मांडवे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page