
ठाणे : दिव्यांग ह्यूमन राईट फेडरेशन च्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकार तसेच रेल्वे प्रशासन यांना दिव्यांगांच्या मागण्यांचे निवेदन सर्व शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. भरत जाधव सर व राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष मोरे तसेच ठाण्याचे संघटक चंद्रकांत पाटील ,महिला महिला अध्यक्ष सुमन पवार ,रिटा मॅडम, सचिव विजय अहिरे ,योगिताआयरे मॅडम ,उषा शिंदे मॅडम,विकास पवार,संत्तेद्र शर्मा,अनिल ताम्हनकर,हरिश मोपेकर,रामचंद्र तनानडे यांनी रेल्वे प्रशासनाचे प्रबंधक घोरपडे सर यांना भेटून दिव्यांग यांच्या मागणीचा विचार करून लवकर कारवाई करावी तसेच दिव्यांग प्रमोद वाडेकर ला जाळल्याबद्दल पाच लाखाचा अनुदान भरपाई द्यावं तसेच सीसीटीव्ही कॅमेरे व पोलीस दिव्यांग डब्यात बसवावा त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनामध्ये पाच टक्के दिव्यांग नोकर भरती करावी तसेच स्टॉलमध्ये दिव्यांग यांना आरक्षण द्यावे अशा प्रकारची मागणी करून करून दिव्यांग ह्यूमन राईट फेडरेशनने रेल्वे प्रशासनाला केली

त्याचप्रमाणे मा. राष्ट्रपती,मा. पंतप्रधान,मा. रेल्वेमंत्री यांना मेल द्वारे निवेदन दिले तसेच ठाणे जिल्हाधिकारी न्यायदंडाधिकारी मा.चव्हाण साहेब यांना भेटून चर्चा करून दिव्यांगांच्या मागण्यांचे निवेदन देऊन राज्य सरकारने दिव्यांगांच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करावी ही मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व मा. राज्यपाल यांना मेलद्वारे दिव्यांग हयुमन राईट फेडरेशनच्या वतीने सर्व वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.