ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) आजच्या महिला दिनाचे निमित्त साधून उपनगरीय रेल्वेच्या सर्व महिला प्रवाशांनी काळी फीत लावून हा निषेध व्यक्त केला. डोंबिवली स्थानकातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला नोकरदार वर्गाची आणि तिकीट-पास काढून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. असे असले तरी रेल्वेने महिलांसाठी अद्यापही डब्बे वाढवलेले नाहीत. काही रेल्वे स्थानकात महिलांसाठी स्वच्छ शौचालयांची सोय केलेली नाही. कधीकधी तर शौचालय चक्क कुलूप बंद अवस्थेत दिसून येतात. अशावेळी महिलांची फारच कुचंबना होताना दिसते. अशा अनेक समस्या महिला प्रवासी सहन करत आहेत. यासाठी आज महिला प्रवासी संघटनेतर्फे डोंबिवली रेल्वे स्थानकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काळ्याफिती लावून हे निषेध आंदोलन केल्याचे प्रवासी महिला संघटनेच्या अध्यक्षा लता आरगडे यांनी सांगितले.
रेल्वे महासंघ आणि तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनांकडून रेल्वे प्रशासनाचा आज निषेध करण्यात आला आहे. काळ्या फीत लावून आज महिलांनी प्रवास केला आहे. कारण ६ महिलांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आम्ही डि.आर.एम साहेबांची आम्ही भेट घेऊन निवेदन सादर केले होते. पण त्या निवेदनाची त्यांनी कोणतीगी दखल घेतली नाही. नेहमीप्रमाणे केराची टोपली दाखवली आणि आम्ही आठ दिवसांपूर्वी पुन्हा एकदा निवेदन सादर करत आठवण करुन दिली आणि आंदोलनाचीही कल्पना दिली आहे. मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे काळ्या फिती लावून निषेध केला आहे, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता आरगडे यांनी सांगितले.
जाहिरात :