समृद्धी महामार्गाबाबत रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना बंदी

Spread the love

मुंबई 09 मे)हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या महामार्गावर दररोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी आरटीओकडून सातत्याने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी मोठा निर्णय घेत आरटीओने रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांची तपासणी सुरू केली आहे. यावेळी रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना प्रत्येकी एक हजाराचा दंडही ठोठावण्यात आला. यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहनाला रिफ्लेक्टर पेंट लावून वाहन जाऊ दिले.

नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले की, ही धडक कारवाई सध्या सौम्य असली तरी दोन दिवसांनंतर या महामार्गावर रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना प्रवास करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. आता पहिल्यांदाच आरटीओकडून वाहनांना रिफ्लेक्टर पेंट लावले जात आहे.

रस्ते वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रेडियम किंवा पेंट असलेले रिफ्लेक्टर बसवणे बंधनकारक आहे. या रिफ्लेक्टरमुळे मागून येणारे वाहन पुढे असणाऱ्या वाहनाला स्पष्टपणे पाहू शकते, त्यामुळे अपघात कमी होण्यास मदत होते.
…………………………………….
🚨रत्नागिरी 24 न्यूज
Rg.No.MH-28-0009536
https://www.ratnagiri24news.com
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक
https://bit.ly/43E2md2

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page