
मंडगणड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष अंतर्गत रसायनशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय रसायनशास्त्राचे जनक आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय यांची जयंती साजरी करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून प्रा. संदीप निर्वाण उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. मुकेश कदम, डॉ. संगीता घाडगे, डॉ. विनोदकुमार चव्हाण, प्रा. शरिफ काझी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते भारतीय रसायनशास्त्राचे जनक आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विभाग प्रमुख डॉ. मुकेश कदम यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करुन त्यांच्या जीवन व कार्यावर थोक्यात प्रकाश टाकला.
मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा. संदीप निर्वाण म्हणाले की, भारतीय रसायनशास्त्राचे जनक म्हणून आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय यांना ओळखले जाते. त्यांनी भारतीय रासानिक उद्योगाला चालना देण्याचे महत्वपूर्ण काम करुन स्वदेशी कंपन्या स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. रॉय यांना त्यांच्या विज्ञानातील भरीव योगदानामुळे ‘आचार्य’ ही पदवी तत्कालीन ब्रिटीश सरकारने बहाल केली. सन 1896 मध्ये मक्र्यूरस नाइटेट या पदार्थाचा शोधामुळे त्यांना जगभरामध्ये वैज्ञानिक म्हणून ओळख मिळाली. त्यांनी आपल्या ‘ए हिस्ट्री ऑफ हिंदू केमेस्ट्री’ या पुस्तकामध्ये प्राचीन भारतातील प्रगत ज्ञानाचे विवेचन केले व स्वदेशी उद्योगाचा पाया रचला.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर यांनी ‘भारतीय शास्त्रज्ञांनी नवनवीन शोध लावून मानवाचे जीवन अधिक सुखकर करण्चा प्रयत्न केला आहे. त्यापैकी एक म्हणजे आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय होय. विद्याथ्र्यांनी अशा शास्त्रज्ञांच्या कार्याला डोळयासमोर ठेवून आपले ध्येय ठरवावे व त्याप्रमाणे समाजोपयोगी संशोधन कार्य करावे अषी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. शरिफ काझी यांनी मानले.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*