
मुंबई, 09 मे 2023- “द केरल स्टोरी” सिनेमावर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने बंदी घातल्यानंतर त्या बंदी विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्याचा इशारा सिनेमाचे निर्माते विपुल शहा यांनी दिला आहे. बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावत असलेल्या या चित्रपटावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चित्रपट प्रदर्शनावर बंदी घातली आहे.
द काश्मीर फाईल्स म्हणजे काय? हा चित्रपट एका समूदायाचा अपमान करण्यासाठी होता. ‘द केरल स्टोरी’ म्हणजे काय?… ही विकृत कथा आहे, असे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चित्रपटावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. समाजात नफरत आणि हिंसा फैलवण्यासाठी हा सिनेमा बनविला आहे. त्यामुळे या सिनेमावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालायचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्याचा व बंदी विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला .