पंतप्रधानांनी सीबीआयला दिला संदेश, एकही भ्रष्टाचारी वाचता कामा नये

Spread the love

✴️सीबीआयचा हिरक महोत्सव, नव्या आव्हानांबद्दल बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी

⏩दिल्ली- भ्रष्टाचारविरोधात अनेक पावले केंद्र सरकारने उचलली आहेत. इतिहासातून आम्हाला शिकले पाहिजे. भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणे वर्षानुवर्षे चालतात. १० वर्षानंतरही कलमे कोणती लावली त्याचीच चर्चा होते. तपासाला वेळ लागतो. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्याला शिक्षा उशिरा मिळते, निर्दोष त्रासतो, पण कोणताही भ्रष्टाचारी वाचता कामा नये याची काळजी आपण घ्यायला हवी, असा संदेश भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना दिला. सीबीआयच्या हिरक महोत्सवानिमित्त पंतप्रधानांनी सीबीआयच्या अधिकारी, कर्मचारी यांना संबोधित करताना भ्रष्टाचार हे देशासमोरील प्रमुख आव्हान असल्याचे म्हटले.

⏩नरेंद्र मोदी म्हणाले की, भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात राजनैतिक पाठबळ भक्कम आहे. तुम्हाला कुठेही थांबण्याची गरज नाही. ज्यांच्याविरोधात कारवाई करतो आहोत ते ताकदवान लोक आहेत. ते सरकारचा हिस्सा होते. त्यांनी एक इकोसिस्टिम केली आहे. त्यांच्या काळ्या कारनाम्यांना लपवत आले आहेत. आपल्या संस्थांवर हल्ला केला जातो. आपले लक्ष विचलित करत राहतील. पण तुम्हाला लक्ष विचलित होऊ द्यायचे नाही. कुणीही भ्रष्टाचारी वाचता कामा नये. ही देशाची इच्छा आहे. देशवासियांची इच्छा आहे. देश तुमच्यासोबत आहे. कायदा तुमच्यासोबत आहे. देशाचा संविधान तुमच्यासोबत आहे.

⏩पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, प्रीमियर तपास यंत्रणेच्या रूपात ६० वर्षांचा हा प्रवास आपण पूर्ण केलात. या सहा दशकांत अनेक गोष्टी या संस्थेने प्राप्त केल्या. सीबीआयशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यांचा संग्रहही प्रकाशित झाला. सीबीआयने गेल्या काहीवर्षात केलेल्या वाटचालीचे दर्शन त्यातून होते. सीबीआयने आपल्या कौशल्याने, कामाने सामान्यजनांना एक विश्वास दिला आहे. आजदेखील लोकांना वाटते की, एखादी गोष्ट असाध्य आहे तेव्हा सीबीआयकडे केस सोपवा अशी मागणी केली जाते. पंचायत स्तरावरील एखादे प्रकरण आले की, याला सीबीआयच्या हवाली करा म्हणतात. न्यायाचा ब्रँड म्हणून सीबीआय प्रत्येकाच्या ओठी आहे. सामान्यजनांचा विश्वास असा जिंकणे सोपे काम नाही. त्यासाठी मागील ६० वर्षात ज्यांनी ज्यांनी योगदान दिले. या संस्थेत काम केलेल्या सगळ्या कर्मचारी अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत. आता अनेक सहकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदकाने सन्मानित कऱण्यात आले. त्यांना माझ्या शुभेच्छा.

⏩येणाऱ्या काळातील आव्हानांचे मंथनही आवश्यक आहे. आपण जे चिंतन शिबीर घेतले आहे त्यातून स्वतःला अपडेट करणे आवश्यक ठरते. भविष्यातील मार्ग शोधले पाहिजे, निर्धारित केले पाहिजेत. कोटी कोटी भारतीयांनी येत्या २५ वर्षात भारताला विकसित करण्याचा संकल्प केला आहे. व्यावसायिक आणि सक्षम संस्थांच्या व्यतिरिक्त हा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून सीबीआयवर खूप मोठी जबाबदारी आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

⏩पंतप्रधानांनी सीबीआयबद्दल विश्वास व्यक्त करताना म्हटले की, मागील सहा दशकांत सीबीआयने स्वतःची एक ओळख केली आहे. त्यांचे कार्य अधिक व्यापक झाले आहे. मुख्य जबाबदारी देशाला भ्रष्टाचारातून मुक्त करण्याची आहे. भ्रष्टाचार सामान्य अपराध नाही. गरीबाकडून भ्रष्टाचार त्याचा हक्क हिसकावून घेतो. भ्रष्टाचारातून अनेक अपराध जन्म घेतात. भ्रष्टाचार लोकशाहीतील मोठा अडथळा असतो. सरकारी तंत्रात भ्रष्टाचार असतो तेव्हा लोकशाहीच्या वाढीला मारक असतो. भ्रष्टाचार होतो तिथे सगळ्यात आधी युवकांच्या संधी हिरावल्या जातात. एक विशेष इकोसिस्टीम फोफावते. भ्रष्टाचार प्रतिभेचा शत्रू आहे. परिवारवादाला खतपाणीही घालतो आणि आपली पकड मजबूत करतो. परिवारवाद वाढतो तेव्हा राष्ट्राचे सामर्थ्य कमी होते. राष्ट्राचे सामर्थ्य कमी होते तेव्हा विकास कमी होतो. गुलामीच्या कालखंडापासून भ्रष्टाचाराचा वारसा आपल्याला मिळाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो वारसा नाहिसा करण्याऐवजी त्याला सशक्त केले गेले. १० वर्षांपूर्वी गोल्डन ज्युबिली साजरी करताना काय स्थिती होती. प्रत्येक प्रकल्प, निर्णय संशयाच्या भोवऱ्यात होते. अनेक आरोप होत होते. पण तेव्हा आरोपी निश्चिंत होते. तेव्हा सिस्टिम आपल्यासोबत आहे असा विश्वास त्यांना होता. त्यामुळे देशाचा या व्यवस्थेवरील विश्वास उडून गेला.

⏩गतकाळातील भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे जे प्रकार देशात झाले त्याची उजळणी पंतप्रधानांनी केली. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांत बँकिंग सेक्टरला आम्ही संकटातून बाहेर काढले आहे. फोन बँकिंगच्या त्या काळात २२ हजार कोटी लुटले आणि पळून गेले. अजून विदेशात पळालेल्या या आरोपींची २० हजार कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. भ्रष्टाचाऱ्यांनी खजिना लुटण्याचा नवा मार्ग शोधला. सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांकडून लूट केली जात होती. आधीच्या सरकारांकडून जी मदत गरीबांना दिली जात होती. ती मध्येच लुटली जात होती. रेशन, घर, शिष्यवृत्ती, पेन्शन अशा अनेक सरकारी योजनांत लाभार्थ्यांना लुटले जात होते. १५ पैसे पोहोचत होते, ८५ पैशांची चोरी होत होती. जनधन, आधार सगळ्या लाभार्थ्यांना सगळ्या गोष्टी मिळत आहेत. बनावट लाभार्थी सिस्टीममधून बाहेर गेलेत. विधवा पेन्शन चालत होते. चुकीच्या हातात पैसा जात होते. एक वेळ होती सरकारी नोकरीत मुलाखत पास होण्यासाठी भ्रष्टाचार होत होता.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page