*( जनशक्तीचा दबाव l नवी दिल्ली l 27 मार्च)*

⏩अवयवदान एखाद्याला नवीन जीवन देण्याचे मोठे माध्यम बनले आहे. माणसाच्या मृत्यूनंतर देहदान केल्यामुळे आठ ते दहा जणांना नवीन जीवन मिळण्याची शक्यता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
⏩मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. रविवारी मन की बातचा ९९ वा भाग प्रसारित झाला. यावेळी पंतप्रधानांनी अमृतसरमध्ये राहणा-या एका खास कुटुंबाशी देखील त्यांनी संवाद साधला. आजच्या मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवयवदानाचे महत्व सांगितले. अवयवदानासाठी कोणताही वयोमर्यादा नाही. रुग्ण कोणत्याही राज्यात अर्ज करु शकतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
⏩सरकारने अवयवदानासाठी ६५ वर्षांखालची वयोमर्यादा ठरवली होती. मात्र, ही अट आता रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अवयवदानासाठी पुढे यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले. तुमचा एक निर्णय अनेकांचे प्राण वाचवू शकतो, आयुष्य घडवू शकतो, असेही पंतप्रधान म्हणाले.
⏩अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण देशात समान धोरणावर काम केले जात आहे. या दिशेने राज्यांचे कायमस्वरुपी रहिवासी असण्याची अटही काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.