राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिशिंगणापूर दौऱ्यावर; शनिदेवाच्या चौथऱ्यावर जावून घेणार दर्शन….

Spread the love

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 30 नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) येथे शनिदेवाचे दर्शन घेणार आहेत. त्यामुळं राष्ट्रपतींच्या स्वागताची तयारी सध्या प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे. आजपासून सर्व रस्ते आणि परिसरात पोलीस बंदोबस्ताचे नियोजन सुरू झाल्याने शनिशिंगणापूरला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय.

शिर्डी (अहमदनगर)- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) दौरा 30 नोव्हेंबर रोजीचा निश्चित झाला आहे. त्यामुळं येथे कामांची लगबग सुरू झालीय. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार डॉ. संजय बिरादार भेटी देऊन पाहणी करत आहेत. केंद्र आणि राज्याची गुप्तचर यंत्रणा, सीआयडी, सुरक्षा यंत्रणा, अन्न आणि औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम आणि देवस्थानचे सर्व विभाग दिवसरात्र नियोजन करत आहेत.

देवस्थानची संपूर्ण यंत्रणा लागली कामाला….

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता शनिशिंगणापूर येथे येणार असून यावेळी संकल्प पूजा आणि शनिदेवाला तेलानं अभिषेक घालणार आहेत. शनिदेवाच्या दर्शनानंतर, शनिदेवाच्या प्रसादाचा देखील लाभ घेणार आहेत. जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रपती दर्शनानंतर भोजन करणार असल्यानं येथील तीन मजली इमारत आणि त्यातील सर्व सूट सजवण्यात आल्या आहेत. प्रशासनाने सूचना केल्याप्रमाणे मंदिर परिसर, मुख्य रस्ता, राष्ट्रपती थांबणार असलेल्या ठिकाणी आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. याकरता देवस्थानची संपूर्ण यंत्रणा दिवसरात्र काम करत आहे, असं शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी सांगितलं.

दिल्लीला काय घेऊन जाणार:

गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन (Shri Saibaba Temple) घेतलं होतं. साईबाबांच्या दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात भोजनही केलं होतं. त्यावेळी मुर्मू यांनी साईबाबांच्या प्रसादालयातील कर्मचाऱ्यांना शेंगदाणा आणि मिरचीचा ठेचा खूप आवडला होता. यामुळं साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांना थेट राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) हा मिर्चीचा ठेचा बनवण्यासाठी आमंत्रित केलं होतं. आता राष्ट्रपती गुरूवारी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या दर्शनासाठी येत आहे. शनिदेव देवस्थानच्या प्रसादालयात प्रसादाचा लाभही घेणार आहेत. यामुळं राष्ट्रपती शनिशिंगणापूर येथून दिल्लीला काय घेऊन जातात हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page