देवरूख- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व महिला विकास कक्ष विभागाच्यावतीने शारदोस्तवानिमित्ताने आणि सरस्वती पूजनाच्या औचित्याने आयोजित केलेल्या ‘पानाफुलांच्या रांगोळी स्पर्धेमध्ये’ २१ स्पर्धकांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कलाकृतींचे सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांनी या कलाकृती पाने, फुले, तांदूळ, गहू, साबुदाणा, विविध प्रकारच्या डाळी, तीळ, काळी मिरी, हळद व कुंकू यांच्या सहाय्याने तयार केल्या होत्या. या स्पर्धेचे परीक्षण महाविद्यालयाचा गुणी विद्यार्थी व राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवातील यशस्वी चित्रकार श्री. सुयोग चंद्रकांत रहाटे यांच्यासह प्रा. धनंजय दळवी आणि प्रा. देवयानी जोशी यांनी केले.
या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:-
प्रथम क्रमांक- चैत्राली गणेश खामकर(१२वी वाणिज्य).
द्वितीय क्रमांक-(विभागून)- चिन्मयी प्रशांत वणकुंद्रे व दिया अजित मुंडेकर(१२वी वाणिज्य- ब).
पूर्वा विकास वेद्रे व प्राची अनिल जाधव(११वी- संयुक्त).
तृतीय क्रमांक(विभागून)- ममता दीपक मुंडेकर व चंदना दिलीप मुंडेकर(११वी बँकिंग).
अथर्व राजेंद्र कदम व साई संतोष मांजरेकर(१२वी कला).
उत्तेजनार्थ (विभागून)- रीया गणपत केदारी व सुकन्या शंकर बागवे (११वी- संयुक्त).
तेजल गणपत वाजे व तन्वी अनंत धावडे(११वी वाणिज्य).
प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी रांगोळी ही भारतीय संस्कृतीमधील पारंपारिक कला असून, मंगल समयी रांगोळी रेखाटनाला विशेष महत्त्व असते. रांगोळीमध्ये विविध प्रकार असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ही कला आत्मसात केली आहे. आपल्या महाविद्यालयातील प्रदीप शिवगण, नंदकिशोर खेडेकर, विलास रहाटे, प्रसाद साळवी, शिवानी वहाळकर, अक्षय वहाळकर आणि सायली शिवगण यासारख्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी उत्तम रांगोळी कला आत्मसात करून महाविद्यालयाला विद्यापीठ आणि आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळवून दिल्याचे याप्रसंगी नमूद केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, प्रा. सुवर्णा साळवी, प्रा. सानिका भालेकर, प्रा. सीमा शेट्ये उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. सीमा कोरे, प्रा. स्वप्नाली झेपले आणि प्रा. संचिता चाळके यांनी मेहनत घेतली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्तम कलाकृतींचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
फोटो- आकर्षक कलाकृतींचा कोलाज.
छाया- हर्ष घाटकर.