प्रतिक सुधीर देसाई यांची भारतीय जनता युवा मोर्चा युवा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती…

Spread the love

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाच्या भाजपा युवा तालुका अध्यक्ष पदी प्रतिक देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतिक देसाई यांचा या भागामध्ये मोठा जनसंपर्क आहे. अनेक युवकांचा भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी पक्ष प्रवेश करून घेतला आहे. युवा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी नुकतेच जिल्हा कार्यकारणी जाहीर केली आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुका अध्यक्ष विवेक सुर्वे, यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करणार असल्याचे प्रतिक देसाई यांनी सांगितले. युवकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार असून पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या युवकांसाठी असलेल्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ जास्तीत जास्त तरुणांना कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिक देसाई यांनी यावेळी सांगितले. प्रतीक देसाई यांची युवा तालुका अध्यक्षपदी निवड होताच सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्ष होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page