मुंबई– राज्यात सत्तांतर होऊन आता एक वर्ष पूर्ण होत आलं. मात्र,तरीही अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. याच मुद्द्याला धरून मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत आमदार प्रताप सरनाईक यांनी लवकरच मंत्री मंडळ विस्तार होईल असं सांगितलं. तसंच मंत्री पदाबाबत सरनाईकांना विचारले असता, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मला मंत्रीपदाचा शब्द दिला होता,ते शब्द पाळतील, असं वक्तव्य केलं आहे.
मागील वर्षी ३० जून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. याला आता एक वर्ष पूर्ण होत आले आहे. विरोधकही रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरून सत्ताधाऱ्यांना वेळोवेळी धारेवर धरत आहे.अश्यात मंत्री मंडळ विस्ताराबाबत शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी सुचक वक्तव्य करत मंत्रीमंडळाचा विस्तार येत्या ८ ते १० दिवसात होईल अशी अशा व्यक्त केली आहे.
दरम्यान जून महिन्यात मंत्री मंडळाचा विस्तार होऊ शकतो,असा अंदाज राजकिय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.सध्या अनेक बडे नेते मंत्रीपदाच्या आशेवर आहेत. जर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आणि यात एखादा बडा नेता नाराज झाला तर याचे मोठे परिणाम शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणूकांमध्ये पाहायला मिळू शकतात. अश्यात आता मंत्री पदाकडे डोळे लावून बसलेल्या नेत्यांना मंत्री मंडळ विस्ताराची बातमी कधी ऐकायला मिळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.