महाविकास आघाडीचा भव्य मेळावा उद्या सायंकाळी देवरूखात पार पडणार… या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीतर्फे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार…
मेळाव्याला उमेदवार प्रशांत यादव यांच्यासह माजी राज्यमंत्री रविंद्र माने, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार रमेशभाई कदम आदी मान्यवर राहणार उपस्थित…
देवरूख- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या संगमेश्वर तालुक्यातील प्रचाराचा नारळ उद्या देवरूखमध्ये फुटणार असून महाविकास आघाडीचा भव्य मेळावा उद्या बुधवारी सायंकाळी ६ वा. देवरूख शहरातील मराठा भवन येथे पार पडणार आहे.
या मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम विरूद्ध महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्यात थेट सामना होणार आहे. प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी उद्या बुधवारी देवरूखमध्ये महाविकास आघाडीचा भव्य मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीतर्फे उद्या जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. तर या मेळाव्याद्वारे प्रशांत यादव यांच्या प्रचाराची तुतारी फुंकली जाणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली आहे.
या मेळाव्याला महाविकास विकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्यासह माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार रमेशभाई कदम, काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, माजी जि. प. उपाध्यक्ष संतोष थेराडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, चिपळूण- संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, तालुकाध्यक्ष बाबा साळवी, देवरूख शहराध्यक्ष निलेश भुवड, महिला नेत्या डॉ. नलीनीताई भुवड, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर, महिला नेत्या नेहा माने, वेदा फडके, प्रद्युम्न माने, मुन्ना थरवळ, छोट्या गवाणकर आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.