देवरूखमधील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रसन्न सार्दळ व उद्योजक बंडू रेवणे यांचा मित्र परिवारासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश..

Spread the love

शिवसेना शिंदे गटाचे देवरूख शहरप्रमुख सनी प्रसादे यांच्या प्रयत्नातून पार पडला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम

देवरूख- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांवर प्रेरीत होऊन व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या कामावर विश्वास ठेऊन देवरूखमधील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रसन्न सार्दळ व उद्योजक बंडू रेवणे यांच्यासह त्यांचा मित्र परिवार यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे देवरूख शहरप्रमुख सनी प्रसादे यांच्या प्रयत्नातून हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

संगमेश्वर तालुक्यात शिवसेना शिंदे गटात इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू असून आता देवरूखमधील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रसन्न सार्दळ व उद्योजक बंडू रेवणे यांच्यासह त्यांचा मित्र परिवार यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद पवार, तालुका संघटक पप्पू गायकवाड व प्रसाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तर शिवसेना देवरूख शहरप्रमुख सनी प्रसादे यांच्या प्रयत्नातून हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

प्रसन्न सार्दळ, बंडू रेवणे, सुनील खवळे, राजू खवळे, सूरज शिंदे, समीर चव्हाण, पारस सावंत, रमेश शिंदे, सिद्धेश शेडगे, राजकुमार गोसावी, रोहित चांदे, आशिष शिंदे, नईम पटेल, आवू चव्हाण यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेत स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेना उपतालुकाप्रमुख मनोहर गुरव, युवासेना शहर प्रमूख सतीश कदम, राजू सावंत, सुधिर चाळके, बाळा माने यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page