केईएम हॉस्पिटल मधील रुग्ण व नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था व्हावी या मागणीचे उपाेषण स्थगित – प्रमाेद जठार

Spread the love

केईएम परिसर हेल्थ कॉरिडॉर जाहीर करण्याची माजी आमदार प्रमोद जठार यांची मागणी

न्यूज ब्युराे (मुंबई) : डीन डॉ. संगीतl रावत व भाजपा माजी आमदार प्रमाेद जठार यांच्यात केईएम हॉस्पिटल मध्ये झालेल्या मीटिंग मधील चर्चl व विनंतीवरून व भोईवाडा पोलीस ठाणे यांचे पोलीस निरीक्षक श्री बोराडे यांच्या उद्या मुंबईत येणाऱ्या मराठा मोर्च्याच्या मुळे पोलिसांवरील ताण कमी व्हावा या विनंती मुळे २६ जानेवारी २०२४ चे मुंबई केईएम हॉस्पिटल येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकlना राहण्या साठी व्यवस्था करावी यासाठी करण्यात येणारे लाक्षणिक उपोषण स्थगित करण्यात येत असल्याचे भाजपा माजी आमदार प्रमाेद जठार यांनी सांगितले.तसेच पुढील बैठक लवकरच मुंबई आयुक्तांसोबत घेण्यात येईल असेही ते म्हणाले.

मुंबईतील टाटा हॅास्पिटल व के.ई.एम हॅास्पिटल येथे देशाच्या कानाकोप-यातून वैद्यकीय उपचार घेण्यासाठी मोठया प्रमाणात येणारा गोर गरीब रूग्ण व नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना फूटपाथवर राहण्याशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात आल्यामुळे माजी आमदार प्रमोद जठार यांनी महानगरपालिकाकडे रूग्ण व नातेवाईक यांच्या राहण्याची सोय व्हावी याकरिता दि.२६/०१/२०२४रोजी “लाक्षणिक उपोषण”करणार असल्याची भूमिका घेतली त्याबाबत पोलिस प्रशासन व महानगरपालिकेच्यावतीने तातडीने दि.२५/०१/२०२४रोजी सकाळी ११वाजता के.ई.एम हॅास्पिटलच्या अधिष्ठाता.

संगिता रावत यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये माजी आमदार यांनी के.ई.एम हॅास्पिटल परिसर “हेल्थ कॅारीडोअर”करण्याची प्रमुख मागणी केली व महानगर पालिकेचा बंद असलेला शाळा व नवीन पुर्नविकास प्रकल्पामध्ये बिल्डर्सकडून एफएसआय बदल्यात मिळणारा जागेमध्ये रूग्ण व नातेवाईक यांची राहण्याची सोय करावी त्याकरिता मी माझे उपोषण करणार त्यावर महानगरपालिकेने यांनी पोलिस प्रशासन व महानगरपालिकेच्यावतीने के.ई.एम हॅास्पिटलचा अधिष्ठातानी मुंबईत दि.२६/०१/२०२४रोजी येणारा मराठा मोर्चाचा पाश्वभूमीवर पोलिस यंत्रणेवर असलेला ताण लक्षात घेवून माजी प्रमोद जठार यांना आपले लाक्षणिक उपोषण स्थगित करण्याची विनंती केली तसेच मा.अति.आयुक्त महानगरपालिका यांच्याशी फोनवरून संर्पक करून माजी आमदार प्रमोद जठार यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी तातडीने बैठक लावण्याची विनंती अधिष्ठाता डॅा.संगिता राव यांनी विनंती केल्यानंतर मा.अति.आयुक्त यांनी विंनती मान्य करून पुढील हाप्तात बैठक आयोजित करावी असे आदेश दिले त्यावर माजी आमदार प्रमोद जठार यांनी महानगरपालिका व पोलिस प्रशासन यांची विनंती मान्य करून तात्पुरता स्वरूपात आपले लाक्षणिक उपोषण स्थगित करतो असे आश्वासन दिलं

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page