दिवंगत पत्रकार विलास होडे यांच्या स्मृतीदिनी १ जुलै रोजी कारभाटले येथील प्रचितगड माध्यमिक विद्यालयात सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण…

Spread the love

देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार व बहुजनांचे कैवारी विलास होडे यांच्या सोळाव्या स्मृतीदिनी सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. कारभाटले प्रचितगड माध्यमिक विद्यालयात दि. १ जुलैला सकाळी ११ वाजता फैज पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विलास होडे प्रबोधिनीची स्थापना, शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लांजा कुणबी विकास सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये हे प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहे. वरील सर्व कार्यक्रमांना जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विलास होडे गौरव ग्रंथ समितीचे अध्यक्ष श्री. युयुत्सु आर्ते यांनी केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page