शहापूर – (महेश धानके/ शांताराम गुडेकर )
मुरबाड येथे २४ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, मुरबाड आयोजित १३२ व्या जयंती महोत्सवात शिवप्रदीपाचार्य डॉ.दिलीप शिवाजी धानके यांना मरणोत्तर समाजरत्न पुरस्कार मुरबाडचे आमदार श्री. किसनजी कथोरे यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार डॉ.दिलीप धानके यांचे धाकले चिरंजीव कु.यश दिलीप धानके यांनी स्वीकारला.२५ हून अधिक प्रकाशित असलेली पुस्तके, पुरोगामी चळवळीत केलेले कार्य, जनक्रांती या शिवप्रेमी संघटनेची स्थापना, विद्रोही साहित्यिक व कवी, फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचा गाढा अभ्यास व त्यातून महाराष्ट्रभर केलेले प्रबोधन, किल्ले माहुली येथे शिवजयंती उत्सवाची सुरुवात व तसेच किल्ले माहुलीस “शिवगर्भ संस्कार भूमी” चा दर्जा मिळण्यात केलेले मोलाचे कार्य, देशातील पहिले “भारतीय संविधानचे” पारायण आणि सामाजिक चळवळीत केलेल्या कार्यासाठी व तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी समिती कडून “मरणोत्तर समाजरत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला.