मुंडे महाविद्यालयात पोस्टर प्रदर्शन कार्यक्रम संपन्न…

Spread the love

मंडणगड(प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय  सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने  ‘शाहु-फुले-आंबेडकर’ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमा अंतर्गत महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन व  भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त  ‘भारताचे संविधान’या विषयावर नुकतेच पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटक म्हणून संस्थेचे संचालक श्री. आदेश मर्चंडे हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर होते. यावेळी संस्थेचे संचालक श्री. संतोष चव्हाण, कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. हनुमंत सुतार, डॉ. ज्योती पेठकर, डॉ. संगीता घाडगे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.   तत्पूर्वी  डॉ. ज्योती पेठकर यांनी प्रास्ताविक करुन कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.  यावेळी ‘भारताचे संविधान’ या विषयावर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या  पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे संचालक श्री. आदेश मर्चंडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या पोस्टर प्रदर्शनामध्ये शुभम मोरे, कल्याणी दिवेकर, राहिल राजबे, साक्षी मोरे, नेहा पवार, मिनाक्षी लोखंडे, अहना मुगरुस्कर, समिना जोगिलकर, सुहानी दूर्गवले, सलोनी जाधव, सिध्दी पंदीरकर, साक्षी तांबे, प्रियांका मर्चंडे, सिमरन मुजावर, दिया रेवाळे, तन्वी शिगवण, जहाना शेख आदी विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला होता.

यावेळी बोलताना संस्थेचे संचालक श्री. आदेश मर्चंडे म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळे आपल्या देशातील सर्वसमान्य जनतेला  संरक्षण मिळाले असून  भारतीय संविधान म्हणजे आपल्या देशाचा कणा आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय एकता व एकात्मता, नागरीकांचे हक्क व कर्तव्ये, समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य व लोकशाही आदी मुल्यांवर हे संविधान उभे आहे. देशाची अखंडता टिकवण्याचे काम संविधानामुळे शक्य झाले आहे. तसेच भारताचे थोर सुपुत्र, विचारवंत,सामाजिक प्रबोधनकार महात्मा जोतीराव फुले यांचा आज स्मृतिदिन असून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करुन समाजाच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. अशाया थोर पुरुषांना अभिवादन करतो असे सांगून या ‘शाहु-फुले-आंबेडकर’ सप्ताह निमित्त संपन्न होणा-या विविध उपक्रमांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.


सदर कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होता. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. संगीता घाडगे यांनी मानले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page