ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) भिवंडी मधील मौजे काल्हेर येथील योगेश्वर इम्प्लांट्स (आय) प्रा. लि. कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची आज दि. २८/०३/२०२३ रोजी महाराष्ट्र जनरल श्रमिक कामगार संघाचे सरचिटणीस श्री. सुप्रिम सुर्वे, उपाध्यक्ष श्री. वैभव विरकर, खजिनदार श्री. विलास कदम, चिटणीस श्री. जयानंद सावंत व कामगार यांच्यासोबत कंपनीचे मालक श्री. तुषार पंड्या, अकाउंटंट श्री. दशरथ जोगळे, ऑपरेटर श्री. अमोल कदम कामगारांच्या समस्यांबाबत चर्चा करून कामगारांना कामावर घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन लेखी आश्वाशनाची पूर्तता केली. व्यवस्थापनाच्या वतीने अमोल कदम यांनी कंपनीचे मालक आणि कामगार संघटना यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा करून सुवर्णमध्य काढून कामगारांचे विविध प्रश्न मार्गी लावले. मुख्य म्हणजे व्यवस्थापनाने बाहेर असलेले कामगार संदीप परब व इतर सात कामगारांना कंपनीत दि. २८/०३/२०२३ रोजीपासून कामावर घेत असल्याचे मान्य केले. तसेच कामगारांचे फेब्रुवारी २०२३ चे वेतन देखील दि. २८/०३/२०२३ रोजी कामगारांच्या खात्यावर टाकणार असल्याचे मान्य करून विलंब झाल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली. यामध्ये संघटना तसेच व्यवस्थापनामध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी कंपनीचे ऑपरेटर श्री. अमोल कदम यांनी खूप मेहनत घेतली. तसेच दि. ०३/०४/२०२३ रोजी कंपनीव्यवस्थापन / मालक श्री. तुषार पंड्या व संघटनेचे सरचिटणीस श्री. सुप्रिम सुर्वे व इतर पधादिकारी व कामगार यांच्यासमवेत चर्चा होऊन सर्व समस्यांबाबत सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले असून त्यास संघटनेने मान्यता दिली.