दिवा शहरात शाळा सुरू होण्याच्या आधी गोरगरीब विद्यार्थी पालकवर्ग आर्थिक संकटात. …

Spread the love

दिवा/ ठाणे/ प्रतिनिधी- दिवा शहरातील अधिकृत व अनाधिकृत शाळेवर होणाऱ्या कारवाईच्या भीतीने दिवा शहरातील गोरगरीब पालकवर्ग चिंतेत,पालकवर्गाने शिवसेना(ठाकरे)गटाच्या विधानसभा संघटिका योगिता मोरे-नाईक यांची भेट घेऊन आपल्या विध्यार्थी पाल्याचे समस्या मांडल्या असता,पालकवर्गाकडून असे सांगण्यात की, दिवा शहरातील अधिकृत शाळेत प्रवेश घेतेवेळी शाळेकडून एका विद्यार्थ्यांची १५ ते २० हजार डोनेशनची मागणी केली जात आहे.

दिवा शहरातील गोरगरीब पालकवर्ग एवढी रक्कम कुठून घेऊन येणार,त्यामुळे पालकवर्ग आर्थिक संकटात मध्ये सापडला आहे असे योगिता  मोरे-नाईक यांनी सांगितले,
विधानसभा संघटिका योगिता मोरे-नाईक लवकरच शिक्षण मंडळाच्या अधिकाराची भेट घेऊन जे विद्यार्थी अनाधिकृत शाळेत शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना अधिकृत शाळेत प्रवेश मोफत करून देण्याची जबाबदारी ही पालिका प्रशासनाची असायला हवी असे झाले तरच त्या गोरगरीब पालकवर्गाला न्याय व आर्थिक संकटापासून दिलासा मिळेल असे योगिता मोरे-नाईक यांनी सांगितले.

अनधिकृत शाळेसंदर्भात महानगरपालिकेची बघायची भूमिका

ठाण्यामध्ये अनधिकृत शाळेचे पेव आले असून अनधिकृत शाळा कोणाची भीती नसल्यासारखे चालू आहेत. बरमसाठ डोनेशन घेऊन या शाळा चालवल्या जात आहेत. महानगरपालिकेकडून कोणती ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने अधिकारी वर्गावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत शाळा बंद झाल्या पाहिजेत अशी मागणी सामान्य लोकांकडून करण्यात येते. राजकारणाचा विषय नसून विद्यार्थ्यांच्या हिताचा विषय आहे त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. प्रशासन कारवाई करत नसल्याने महानगरपालिकेची भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page