
*मुंबई-* राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले असून, या सोडतीमुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली. 50 टक्के महिला आरक्षणाचा नियम लागू केल्यामुळे यंदा तब्बल 15 महानगरपालिकांमध्ये महिला महापौर विराजमान होणार असून, उर्वरित 14 ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गाला संधी मिळणार आहे.
राज्यातील महत्त्वाच्या चार महापालिका – मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर – यांच्या आरक्षणाकडे विशेष लक्ष लागले होते. या चारही महापालिकांमधील आरक्षण जाहीर होताच स्थानिक राजकीय समीकरणे स्पष्ट होऊ लागली आहेत.
*मुंबई : सर्वसाधारण महिला आरक्षण..*
राज्यातील सर्वात मोठी आणि आर्थिक राजधानी असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात महिला नेतृत्वाला मोठी संधी मिळाली आहे. महिला आरक्षणामुळे प्रमुख पक्षांमध्ये इच्छुक महिला नगरसेविकांची नावे पुढे येऊ लागली असून, पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.
*पुणे : सर्वसाधारण महिला महापौर*
राज्याच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुणे महानगरपालिकेतही महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. पुण्यातील महापालिका निवडणूक नेहमीच चुरशीची ठरते. महिला आरक्षणामुळे येथेही सर्व प्रमुख पक्षांकडून प्रभावी महिला चेहऱ्यांचा शोध सुरू झाला आहे.
*छत्रपती संभाजीनगर : सर्वसाधारण प्रवर्ग..*
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले आहे. त्यामुळे येथे महिला अथवा पुरुष अशा दोन्ही उमेदवारांना संधी उपलब्ध आहे. या आरक्षणामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत पार पडली असून, यंदा महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटल्याने शहराच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. शहराचा प्रथम नागरिक कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीत 57 जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे महापौरपदावर भाजपचाच उमेदवार विराजमान होणार असल्याचे चित्र आहे.सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सुटल्याने भाजपमधील अनेक ज्येष्ठ आणि प्रभावी नगरसेवकांची नावे चर्चेत आली आहेत. त्यामध्ये राजगौरव वानखेडे, महेश माळवतकर, विजय औताडे, गणेश नावंदर, शिवाजी दांडगे, रामेश्वर भादवे, समीर राजूरकर, सुरेंद्र कुलकर्णी, सुनील जगताप, अप्पासाहेब हिवाळे आणि रेणुकादास वैद्य या नगरसेवकांचा प्रामुख्याने समावेश आहे.
*नागपूर : सर्वसाधारण प्रवर्ग*
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूर महानगरपालिकेतही महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे येथे कोणत्याही राखीव प्रवर्गाचा अडसर नसून, राजकीय वजनदार नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. नागपूरच्या महापौरपदाकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
*महानगरपालिकेचे नाव महापौरपदासाठी आरक्षित प्रवर्ग…*
1) कल्याण-डोंबिवली- अनुसूचित जमाती
2) ठाणे- अनुसूचित जाती (पुरुष)
3) जालना -अनुसूचित जाती (महिला)
4) लातूर -अनुसूचित जाती (महिला)
5) इचलकरंजी- ओबीसी / पुरुष
6) पनवेल- ओबीसी / पुरुष
7 )अकोला- ओबीसी / महिला
8) अहिल्यानगर -ओबीसी / महिला
9) उल्हासनगर -ओबीसी / पुरुष
10) कोल्हापूर- ओबीसी / पुरुष
11 )चंद्रपूर ओबीसी / महिला
12) जळगाव ओबीसी / महिला
13) अमरावती सर्वसाधारण
14) छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण
15) धुळे महिला
16) नवी मुंबई महिला
17 )लातूर अनुसूचित जाती – महिला
18) नांदेड–वाघाळा सर्वसाधारण – महिला
19) नाशिक- महिला
20) परभणी – सर्वसाधारण
21) पुणे- महिला
22) मुंबई -महिला
23) मालेगाव- महिला
24) मीरा भाईंदर -महिला
25 )वसई/विरार -सर्वसाधारण
26 )सोलापूर- सर्वसाधारण
27) सांगली/मिरज/कुपवाड- सर्वसाधारण
28 )भिवंडी -सर्वसाधारण
29) पिंपरी/चिंचवड -सर्वसाधारण
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*