ठाणे : निलेश घाग कल्याणमध्ये दोन गटात राडा प्रकरणात दोन पोलिस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे. या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर सोपविलेलील जबाबदारी त्यांनी योग्य प्रकारे पार पडली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अनिल जातक आणि महादेव चेपटे अशी या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहे. कल्याण पश्चिमेतील चिराग हॉटेल परिसरात सोमवारी दोन गटात वाद झाला होता.
कल्याण-कल्याणमध्ये दोन गटात राडा प्रकरणात दोन पोलिस कर्मचारी निलंबित.
यामध्ये सोशल मिडिया फेम अनिल जातक या पोलिसाचा समावेश आहे. कोरोना काळात जनजागृती करण्यासाठी अनिल जातक यांनी चांगले काम केले होेते. नागरीकांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. हे पाहता. त्यांना चिराग हॉटेल परिसरात एका ठिकाणी कर्तव्य बजाविण्याकरीता नेमण्यात आले होते. त्यांच्यासोबत पोलिस कर्मचारी महादेव चेपटे हे देखील होते दुपारच्या वेळेस जेवण करण्याकरीता हे दोघेही पोलिस कर्मचारी दिलेले ठिकाण सोडून गेले. याच वेळी एका गटातील तरुण त्याच्या गाड्या घेऊन ब’रेकेट हटवून आत गेले. त्याठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी काही अप्रिय घटना घडली नाही. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली. मात्र ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी होती. त्यानी बेजबाबदारपणा दाखविल्याने त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.
जाहिरात
जाहिरात