नवी मुंबई :एपीएमसी परिसरात हुक्क्का पार्लर नित्याचीच बाब झाली आहे मात्र आता यावर पोलिसांनी कडक कडक धोर स्विकारले असून सतरा प्लाझा या इमारतीतील प्रतिष्टीत समजल्या जाणार्या हुक्का पार्लर वर कारवाई करण्यात आली आहे.
एपीएमसी आवारात चालणाऱ्या पब, हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. बुधवारी रात्री एपीएमसी मधील कबाना लॉज मध्ये हुक्का पार्लर प्रमाणे हुक्का दिला जात होता. या ठिकाणी रात्री बाराच्या सुमारास धाड टाकण्यात आली त्यावेळी यानुसार सोहेल खान, नितीन गार्गव, सुजल कनोजिया व जावेद पठाण हे कर्मचारी हुक्का देत असल्याचे निदर्शनास आले त्यांच्या वर कारवाई करण्यात आली तसेच ३ हजार ९०० रुपयांचा हुक्का व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
तसेच एपीएमसी आवारातील पामबीच गॅलेरीया मॉलमधील, कॅफे अरेबियन नाईट्स मध्येही हुक्का पार्लर चालवला जात होता. त्याठिकाणी हुक्का ओढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची ये-जा सुरू होती. याचीही माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती.याही ठिकाणी धाड टाकण्यात आली. रोहन सालियन, जयप्रकाश शेट्टी , अरुण सिसोदीया यांच्यावर कारवाई करण्यात आली. या ठिकाणीही हुक्का व त्या समंधीत ४ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.