
संगमेश्वर दिनेश आंब्रे- रायगड अलिबाग येथे पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक उदय झावरे यांची देवरुख पोलीस ठाणे येथे बदली झालेली आहे. आज दुपारी ते आपल्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. अत्यंत कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आज पर्यंत अनेक गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना शिक्षाही झालेली आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या लेखी पत्राद्वारे आज दिनांक 27 जून 2025 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ते आपला पदभार स्वीकारण्यात आहेत.


यापूर्वी उदय जयकुमार झावरे हे संगमेश्वर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये उत्कृष्ट काम करून संगमेश्वर वासियांना सहकार्य केले होते. तसेच संगमेश्वर मध्ये मॅरेथॉन स्पर्धा विविध सामाजिक उपक्रम ही त्यांनी राबवले होते .साडेचार वर्ष संगमेश्वर येथे पोलीस निरीक्षक पदावरती त्यांनी काम केलेले आहे. त्यांची संगमेश्वर येथील आणि आजपर्यंतची पोलीस खात्यातील उल्लेखनीय अशी कामगिरी आहे.

उदय झावरे साहेबांची परत एकदा संगमेश्वर तालुक्यात नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.