जनशक्तीचा दबाव रत्नागिरी प्रतिनिधी,27 ऑक्टोबर- रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मारळ (ता. संगमेश्वर) येथे विनापरवाना हातभट्टीची गावठी दारू विक्रीवर कारवाई केली. या कारवाईत ९७० रुपयांची १८ लिटर दारू पोलिसांनी जप्त केली. देवरूख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
धर्मदास गंगाराम पवार (वय ३८, रा. बौद्धवाडी-मारळ, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी (ता. २५) सायंकाळी मारळ-बौद्धवाडी येथील गुरांच्या गोठ्याच्या आडोशाला निदर्शनास आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार सत्यजित दरेकर यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली.