EVM विरोधात आवाज उठवणाऱ्या मारकडवाडीत पोलिसांची कारवाई! १७ जणांसह १०० ते २०० ग्रामस्थांवर गुन्हे दाखल…

Spread the love

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी ग्रामस्थांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मतपत्रीकेवर मतदान आयोजित केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे 

सोलापूर प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी ग्रामस्थांनी ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारत मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी या ठिकाणी मतदान होणार होते. मात्र, प्रशासनाने याला विरोध केला होता, त्यामुळे ही मतमोजणी रद्द करावी लागली. दरम्यान, या नंतर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आह. ज्यांनी हे मतदान आयोजित केले होते त्याच्यावर आता गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. गावातील १७ जणांसह तब्बल १५० टए २०० ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

माळशिरस विधानसभा मतदार संघात शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर हे या या मतदार संघातून निवडून आले आहेत. मात्र, मारकडवाडी गावातून भाजपचे राम सातपुते यांना सर्वाधिक मते मिळाली. त्यामुळे नागरिकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत या ठिकाणी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली होती. हे मतदान मंगळवारी घेतले जाणार होते. मात्र, या विरोधात पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करत काही ग्रामस्थांना नोटिसा पाठवल्या होत्या. जर मतदान घेतले तर बरे होणार नाही असा इशारा देखील पोलिसांनी दिला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी कारवाईच्या भीतीने मतदान रद्द केले होते. गावात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत जमावबंदी देखील लागू केली होती.

दरम्यान, मतदान रद्द झाल्यावर पोलिसांनी आता ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम मशीन संदर्भात ग्रामस्थांनी अफवा पसवली असून यातून फेर मतदान घेण्याचे ठरवत प्रशासनाचे आदेश डावलल्याने गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या सोबतच बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करून भीती निर्माण करत समाजात द्वेषाची भावना निर्माण केल्याचाही पोलिसांनी आरोप ठेवला आहे. माळशिरसच्या नातेपुते पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान या कारवाईवर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एका पत्रकातून ही टीका केली आहे. मारकडवाडीमध्ये प्रशासन अत्याचारी ब्रिटिशांप्रमाणे वागले, त्यामुळे ईव्हीएम व निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले ते आणखी गडद झाले आहे. ‘कर नाही तर डर कशाला?’ याप्रमाणे प्रशासनाने हे मतदान पार पडू द्यायला हवे होते असे पटोले म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page