गणेशोत्सवासाठी मुंबईतून २२०० , तर रत्नागिरीतून १५५० गाड्यांचं नियोजन..

Spread the love

रत्नागिरी ,03 ऑगस्ट – कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाते. या कालावधीत लाखो चाकरमानी कोकणात दाखल होतात. त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबईतून २ हजार २०० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून १ हजार ५५० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. आतापर्यंत २७९ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे, अशी माहिती एसटीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

ते म्हणाले, रत्नागिरी विभागातील नऊ आगारातून बोरीवली, मुंबई, ठाणे, विठ्ठलवाडी, नालासोपारा, विरार, भांडूप, भाईंदर, पुणे मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार ग्रुप बुकींगच्या बसेसही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रत्येक बसस्थानक तसेच खासगी आरक्षण केंद्राकडे आरक्षण सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल ॲपव्दारे प्रवाशांना ऑनलाईन आरक्षणही करता येईल.

प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असल्याने १५ सप्टेंबरपासून जादा गाड्यांचे आगमन होणार आहे. २३ पासून परतीसाठी एसटीच्या बसेस सोडण्यात येतील. परतीसाठी २७९ गाड्यांचे आरक्षण आताच फुल्ल झाले आहे. दापोली आगारातून २००, खेड १५०, चिपळूण २३०, गुहागर २६०, देवरूख १८०, रत्नागिरी १५०, लांजा १३०, राजापूर १७०, मंडणगड आगारातून ८० मिळून, अशा एकूण १५५० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.

प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केले तर त्यांना गावातून थेट बस सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी गावागावांतील सरंपचांशी संपर्क साधून ग्रुप बुकिंग सुविधेबद्दल माहिती दिली जाणार आहे. दापोली आगारातून ५८, खेड ४४, चिपळूण ५७, गुहागर २६, देवरूख १५, रत्नागिरी १५, रत्नागिरी २०, लांजा ८, राजापूर ३७, मंडणगड आगारातून १४ मिळून विभागातून एकूण २७९ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध एसटीच्या जादा गाड्यांच्या सुविधेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन विभागनियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page