लाभार्थ्याला ग्रामपंचायतीने वारंवार सहकार्य करूनही बदनामी
पत्रकार परिषदेत सरपंचाने दिले विविध पुरावे.
संगमेश्वर दि 30 प्रतिनिधी:
संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे ग्रामपंचायतीने घरकुल बाबत लाभार्थ्याला वेळोवेळी सहकार्य करूनही लाभार्थी काही लोकांनी हाताशी घेऊन ग्रामपंचायतीची उगाचच बदनामी करीत आहे. तसेच खोट्या बातम्या प्रसिद्ध करून ग्रामपंचायत बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांशी करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत ग्रामपंचायतीने दिली आहे.
पिरंदवणे ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सरपंच विश्वास रामचंद्र घेवडे, ग्रामसेवक सौ माया गुरखे, प्रकाश गमरे सह सदस्य उपस्थित होते. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की पिरंदवणे येथे झालेल्या ग्रामसभेमध्ये लाभार्थी प्राधान्य क्रमानुसार यादी तयार करून मंजूसाठी पाठविण्यात आली. त्या यादीमध्ये रद्द झालेले घर श्रीमती नम्रता विठोबा शिंदे व सदानंद हरिचंद्र गुरव यांचा प्रस्ताव तयार केला होता. त्यामध्ये संबंधित सह हिस्सेदारांचे संमती पत्र दिले नाही तसेच यामध्ये सहहिसेदार मालती लक्ष्मण गुरव यांची तक्रार झाली. तक्रार झाल्याने त्या ठिकाणी घर न बांधता दुसऱ्या ठिकाणी जागा बदलण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून स्वतः लाभार्थी मंजूरचे पत्र घेऊन आले. पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या आदेशाने प्रस्ताव पुन्हा ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित लाभार्थी व तक्रारी आणि जागेची मोजणी करून जागा सिद्ध करावी व त्यानंतर प्रस्ताव देण्यात यावा असे एका मताने ठरवण्यात आले त्यानंतर प्रस्ताव पंचायत समिती देवरुख येथे मंजुरीसाठी पाठवण्यात आला व घराच्या कामाला सुरुवात झाली त्यानंतर सहहिस्सेदार यांनी पुन्हा तक्रार केली तसेच त्यांनी कोर्टाकडे धाव घेतली. सदर बाब न्यायालयीन असल्याने याबाबत ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही. ग्रामपंचायत पिरंदवणे यांनी सदर लाभार्थ्याला मासिक सभेमध्ये ठराव द्वारे घर बांधण्यासाठी तात्पुरती स्थगिती दिलेली आहे न्यायालयीन बाब एकत्र येण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत होती तसेच लाभार्थी सदानंद हरिचंद्र गुरव व सहहिस्सेदारांची जमिनीवरून वाद असल्याने ह्याला संबंधित लाभार्थी जबाबदार आहेत व संबंधित लाभार्थ्याच्या बाजूने संजय वासुदेव गुरव, योगेश अरविंद मुळ्ये,वासुदेव कृष्ण गुरव आणि अरविंद गणेश मुळ्ये हे लाभार्थ्याला वेळोवेळी चुकीची माहिती देऊन गावाची व ग्रामपंचायतची बदनामी करीत असल्याचे पत्रकार परिषदेत ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात येते.