लांजा : लांजा तालुक्यातील पडवण येथे प्रौढाने अज्ञात कारणातून फिनेल प्राशन केले . त्याला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश गणपत कदम ( ४५ , रा . पडवण लांजा , रत्नागिरी ) असे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या प्रौढाचे नाव आहे . मंगेशने रविवार ९ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास राहत्या घरी फिनेल प्राशन केले . काही वेळाने त्याला अस्वस्थ वाटू लागल्यावर त्याच्या नातेवाईकांनी त्याला प्रथम लांजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल कैले होते . त्यानंतर अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकित नोंद करण्यात आली आहे .