
नवी मुंबई- दिनांक २५/०५/२०२३ रोजी, सी बी डी बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये दुपारी ३ वा. झालेल्या आमंत्रित बैठकीत कोकण रेल्वे कॉ. लि. चे अध्यक्ष आणि संचालक श्री. संजयजी गुप्ता साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, कोकण विभागाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासदार श्री.विनायक राऊत तसेच केआरसीएलचे प्रशासकीय अधिकारी वर्ग, संबधित कर्मचारी, त्याचप्रमाणे विविध कोकण प्रवासी संघटना, संबंधित संघटना व कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) ठाणे संघटनेचे प्रतिनिधित्व करीत प्रमुख सल्लागार श्री राजू कांबळे, सचिव श्री.दर्शन कासले अतिमहत्त्वाच्या विषयासंदर्भात चर्चा विवरणासाठी आवर्जून उपस्थित होते.
या चर्चेत कोकणातील गणेशोत्सवासाठी चार महिने आगाऊ आरक्षण तिकीट विक्रीत प्रचंड प्रमाणात झालेल्या सावळागोंधळात अमर्यादीत गडबड घोटाळा, तिकिटांचा काळाबाजार झाला. या संबंधी खासदार विनायक राऊत यांनी सखोल चर्चा करीत जाब विचारत खुलासा करण्याची मागणी केली. तसेच गणेशोत्सवासाठी अधिक गाड्यांची मागणी करीत कोकण रेल्वे प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची काळजी घेण्या संबंधीची चर्चा करण्यात आली. इतर विषयांची देखील चर्चा करून कोकण कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे संघटनेच्या वतीने राजू कांबळे, दर्शन कासले, संतोष पवार, संतोष निकम, यशवंत बावदाणे,सुहास तोडणकर, तुषार साळवी, समीर नलावडे, गोपीचंद गुरव, नागेश गुरव, विजय जगताप,प्रमोद घाग,नामदेव चव्हाण, साहील सकपाळ यांनी खासदार विनायक राऊत यांस विशेष महत्त्वाच्या मुद्यांवरील निवेदन पत्रक सादर केले.