चिपळूण :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपूलाचा भाग आणि त्यावरील लाँचर अद्याप काढण्यात आलेले नाही. कोसळलेला पुलाचा भाग काढण्याबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील काम सुरू केले जाणार आहे.
दुर्घटनाग्रस्त पुलाच्या दोन्ही बाजूने असलेल्या सर्व्हिस रोडवरून वाहतूक सुरू असल्याने पुलाचे चित्र काहीसे भीतीदायक आहे.