⏩नवी दिल्ली ,21 एप्रिल-
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते व राज्यसभा खासदार राघव चड्ढा सध्या त्यांच्या नात्याबद्दल आणि त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची एंगेजमेंट झाली असल्याचे एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. या वर्षाच्या शेवटी हे जोडपे लग्न करण्याचा विचार करत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. परिणीती आणि राघव या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस लग्न करू शकतात असा दावा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, परिणीतीची बहीण, अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास त्याच वेळी जिओ फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहे. परिणीती चोप्रा सध्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने लग्नाची तारीख ही चार महिन्यांनंतर काढण्यात येणार आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
पहिल्यांदा यांना मुंबईमध्ये एका हाॅटेलबाहेर स्पाॅट केले गेले आणि तेंव्हापासूनच यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा रंगत होत्या. चाहते देखील या लग्नाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत, त्यामध्ये आता यांचे लग्न ठरल्याचे रिपोर्टमध्ये म्हटल्यापासून चाहत्यांमध्ये आनंद आहे. अनेकांनी तर थेट राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना शुभेच्छा देण्यासही सुरूवात केली आहे.
…………………………………….