भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले ‘वाघ बकरी चहा’चे मालक पराग देसाई यांचे निधन..

Spread the love

अहमदाबाद : वाघ बकरी चहा समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन झाले आहे. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. १५ ऑक्टोबर रोजी, रविवारी मॉर्निंग वॉकला निघालेल्या पराग देसाई यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. कुत्र्याच्या हल्ल्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात असताना ते घसरुन पडले आणि त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली. रविवारी, २२ ऑक्टोबरला सकाळी अहमदाबादमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

इस्कॉन आंबळी रोडवर मॉर्निंग वॉक करताना पराग देसाईंवर भटक्या कुत्र्यांनी हल्ल्या केला यातून स्वत: ला वाचवताना पळत असताना त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर पडले. त्यांच्या मेंदुला गंभीर दुखापत झाली. तत्काळ त्यांना शेल्बी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर त्याला शस्त्रक्रियेसाठी झायडस रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे २२ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. पराग देसाई हे वाघ बकरी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रस देसाई यांचे पुत्र आहेत.

पराग देसाई यांनी न्यूयॉर्कमधील लॉन आयलँड विद्यापीठातून एमबीए पूर्ण केलं होतं. चहाच्या व्यवसायात असलेली त्यांच्या कुटुंबातील ही चौथी पिढी होती. पराग देसाई यांच्या नेतृत्वाखाली कंपनी नवीनवीन उंची गाठण्यात यशस्वी ठरली आहे. व्यवसायासोबतच पराग देसाई यांना वन्य प्राण्यांबद्दलही प्रचंड आवड होती. पराग देसाई १९९५ मध्ये वाघ बकरी चहामध्ये सामील झाले. त्यावेळी कंपनीची एकूण उलाढाल १०० कोटी रुपयांपेक्षा कमी होती. पण आज वार्षिक उलाढाल २००० कोटींच्या पुढे गेली आहे. वाघ बकरी चहा भारतातील २४ राज्यांमध्ये तसेच जगातील ६० देशांमध्ये निर्यात केला जातो. देसाईंच्या योजनेमुळेच कंपनीचे ब्रँडिंग मजबूत झाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page