
पनवेल/प्रतिनिधी- पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने शहरातील लक्ष्मी वसाहत येथील अविनाश शिंदे यांच्या छताला पत्रा असलेल्या घरामध्ये धाड टाकून केलेल्या विशेष कारवाईत आठ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून जुगारासाठी वापरलेली रोख रक्कम हस्तगत केली आहे.
नितीन ठाकरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून करण्यात आली कारवाई…
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांना लक्ष्मी वसाहत येथे बेकायदेशीररित्या जुगार अड्डा चालवून तेथे रोख रक्कमेचा वापर करून 13 पानी पत्ते लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि. सुनील वाघ, पोउपनि. हजरत पठाण, पो.ना. रवींद्र पारधी आदींच्या पथकाने सदर ठिकाणी धाड टाकून बेकायदेशीररित्या जुगार खेळणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम जुगार खेळण्यासाठी वापरलेली हस्तगत केली आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीररित्या जुगार तसेच इतर व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

कपल डिंपल मधील जुगार अड्ड्यावर सात ऑगस्ट रोजी करण्यात आली होती कारवाई…
पनवेल मधील कपल डिंपल बिल्डींग मध्ये पनवेल पोलिसांनी सात ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास तेरा पत्ते 21 पत्ते 27 पत्ते असे जुगार खेळताना कपल डिंपल बिल्डींग मध्ये कारवाई करण्यात आली होती. सदर वेळेला मुद्देमाल जप्त करून खेळणाऱ्या लोकांसह चालवणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. सदर बिल्डींग मध्ये तळमजल्यामध्ये ऑर्केस्ट्रा लाईव्ह बर असून अनेक वेळा सदर क्लब वर कारवाई करू नाही सदर बार व क्लब चालू असतो. याचे गोड बंगाल काही कळत नसल्याची लोकांमध्ये चर्चा आहे. सोशल लायसन वरती सदरचे जुगार अड्डे चालू असल्याचे समजते परंतु सदर ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता सदरचे जुगारट्टी चालवले जात असल्याची चर्चा आहे. ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सदरची दाढ कारवाई करण्यात आलेली आहे.

सोशल वर्क लायसन नसतानाही जुगार अड्डे चालू…
पनवेल मध्ये अनेक ठिकाणी जुगार अड्ड्यांसाठी लागणारी लायसन नसू नये अधिकृत जुगार अड्डे जोरात चालू आहेत. सर आज करून 13 पत्ते, 21 पत्ते, 27 पत्ते, रमी पत्त्यांचा खेळ, व्हिडिओ गेम, तेव्हा अनेक अनधिकृत चालू आहेत. सदर जुगार अड्ड्यांवर कारवाई करायचे काम पनवेल पोलिसांनी हाती घेतल्याचे दिसून येत आहे. पनवेल मधील कपल डिंपल बिल्डिंग वरील जुगार अड्ड्यावर झालेली कारवाई माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली. सदर विषयाची कारवाई ऑनलाइन एफ आय आर असून योग्य पद्धतीने कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कारवाई मध्ये मूळ जुगार चालवण्याबरोबर कारवाई नाहीच…
अनेकांची नावे समोर परंतु कारवाई मध्ये संबंधित इस्मानवर कारवाई करण्यात आलेली नाही. कपल डिंपल मध्ये चालू असलेला जुगार अड्डा भगवान भोईर (कर्जत), राजू अण्णा शेट्टी (पनवेल) बाबू अण्णा शेट्टी (पनवेल), योगेश देशमुख (कर्जत), मनोज दिसले (कर्जत, भिसेगाव) हे सर्व मिळून सदरचा जुगार अड्डा चालवत असल्याचे विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे. परंतु पोलिसांकडून करवाई करण्यात आलेल्यांमध्ये शेजारी सणांची नावे नसल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे कारवाई करण्यात आली की नवापूर ते कारवाई करण्यात आली असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित करण्यात येते. लवकरच या संदर्भामध्ये देवेंद्र फडणीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
सोशल वर्क लायसन वरती करण्यात येणारे धंदे अनधिकृत असून सदर लायसन मध्ये करमणूक साठी चालवण्याची परवानगी असते. परंतु सर्रास करून सर्वच ठिकाणी पत्त्यांच्या गेम वर जुगार अड्डे चालवले जातात असे दिसून येत आहे. पनवेल मध्ये अनेक ठिकाणी असे धंदे चालू असल्याचे दिसून आले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांची सदर धंद्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे. परवा परंतु कारवाई तोटक होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आले.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर