
मराठा, ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न आहे. मी तुम्हाला फक्त स्वाभिमान देऊ शकते, असे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितले. त्या सावरगाव येथील सभेत बोलत आहेत.
बीड- भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज बीडमध्ये दसरा मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलंय. मी जनतेची कर्जदार आहे. लोकांच्या मनामध्ये काहूर आहे. मी तुमची ताईसाहेब नसून आई असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.
राजकारणात ताईपासून मी आईच्या भूमिकेत आहे. एकवेळ मी मेहनत करेल तुमच्यासाठी पण स्वाभिमान घहान टाकरणार नसल्याचं मुंडे म्हणाला. उसोतड कामगाराना न्याय देऊ शकले नाही, असं त्या म्हणाल्या पुढच्या दसऱ्याला ऊसतोड कामगारांना मी न्याय दिल्याशिवाय राहणार नसल्याचं मुंडे म्हणाल्या. दुसऱ्या पक्षात जाण्या एवढी मी लाचार नसल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. गोपीनाथ गड मी तीन महिन्यात बांधला मात्र, सरकारनं गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बांधलं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केलीय.
जाती पातीच्या राजकारणाच्या भिंती तोडून आपण एक व्हायला हवं. मी पडले ते झालं, मात्र, मी आता पाडणार असल्याचा निर्धार त्यांनी केला. शेतकरी, बेरोजागारी, महागाविरोधात जो काम करणार नाही मी त्याला पाडणार असल्याचं पकंजा म्हणाल्या.
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचं पंकजा यांनी म्हटलं आहे. तुम्हाला न्याय देण्यासाठी मी मैदानात आहे. तुमची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत मला कोणीही कोणीही हटवू शकणार नसल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. मी आता मौदानात राहणार आहे. मी घरी बसणार नाही. तुम्ही मला बळ द्या, मी कधीच कुणासमोर झुकणार नाही, माझ्या येणाऱ्या प्रवासाच्या प्रतीक्षेत तुम्ही साक्षीदार आहे.
भाजपा नेत्या सावरगाव येथील सभास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. पंकजा मुंडे म्हणाल्या, आपला आवाज पूर्ण देशात पोहोचला पाहिजे. सभेला राज्याच्या प्रत्येक भागातून लोक आले आहेत. मला कोणते पद किंवा खुर्ची मिळाल्यानं तुम्ही आला आहात का? मी राजकारण करावं का मी सोडून देऊ..
माझ्या कारखान्यावर जीएसटीची कारवाई झाली. तुम्ही निधीचा पाऊस पाडला. माझ्या आयुष्यात मी निवडणूक हरले. पण तुमच्या नजरेतून हरले नाही. पैसे वाढवून दिल्याशिवाय ऊसतोड कामगार कामावर जाणार नाही. आमच्या कातड्याचे जोडे केले तरी, तुमचे उपकार फिटणार नाही, अशी भावना त्यानी मांडली. सभेत सर्व जाती-धर्माचे लोक आहेत.

