
रत्नागिरी: प्रतिनिधी (विनोद चव्हाण) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपाच्या निमित्ताने “मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियानात देशभ साजरा होत असताना राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायत मध्ये समस्त ग्रामस्थाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांनी पंच प्रण शपत घेतली.
भारताला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित देश बनवण्याचे स्वप्न साकारू. गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगू. भारताची एकता अधिक मजबूत करू, देशाचे रक्षण करणाऱ्यांचा सन्मान ठेवू. नागरिक म्हणून स्वतःचे कर्तव्य पार पाडू अशी शपथ ग्रावाचे प्रथम नागरिक सरपंच देवेश तळेकर आणि ग्रामसेवक सोनाली सिद्धार्थ हिवाळेयां यांच्या उपस्थितीत सर्व ग्रामस्त यांनी घेतली या अभियानात मोठ्या संख्येने ग्रामस्त आणि विध्यार्थी शिक्षक कर्मचारी सहभागी झाले होते.

देशासाठी ज्यांनी बलिदान दिले, अशा थोर महात्म्यांना आदरांजली अर्पंकर करण्यात आली. देश प्रती प्रेम जागरूक करून देताना माझी सैनिक यांनी अनुवलेली अनेक उदारणे देत मुलांना आणि ग्रामस्थांना संबोधित केले. आजची तरुण पिढी हेच देशाचे भविष्य आहे त्यांनी शिक्षणासोबत देशसेवाची सेवा कशी करता येईल यावर मार्गदर्शन केले. मोबाईल वापर हा अभ्यास आणि चांगल्यागोष्टीसाठी करावा! त्याचा चुकीचा वापर आज होताना पाहायला मिळत आहे असे हि ते म्हणाले. तसेच वसुधा संवर्धन करिता वृक्षारोपण उपक्रमातंर्गत विविध प्रजाती रोपांची लागवड ग्रामपंचायत परिसरात करण्यात आली निसर्गा प्रति कृतज्ञता राहण्याबाबत मार्गदर्शन ग्रामसेवक हिवाळे मॅडम यांनी केले.
“मेरी मिट्टी मेरा देश या अभियानात पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी गुळरांदे, सरपंच देवेश गोविंद तळेकर, ग्रामसेवक सोनाली सिद्धार्थ हिवाळे, माझी सैनिक श्रीधर शंकर पाटील, सखी ग्रामसंघ अध्यक्ष प्राजक्ता प्रदीप पांचाळ, उपसरपंच जयवंत अर्जुन शेडेकर, कळसवली केंद्रशाळेचे शिक्षक कोसंबे सर सावंत मॅडम, वळवी सर, अमित बाणे, शाळा शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव ठाकूर देसाई आणि विध्यार्थी शिक्षक कर्मचारी, ग्रामस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जाहिरात






