पालघर : महाराष्ट्र राज्य २०२५ पर्यंत कुष्ठरोग मुक्त करण्याचा विडा शासनाने उचलला असला तरी राज्यात आजही सुमारे १६ हजार ०९४ इतकी कुष्ठरोग्यांची संख्या असून पालघर जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची एकूण संख्या 1311 रुग्ण असल्याने कुष्ठरोगाच्या रुग्णात पालघर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
त्यात ५१ टक्के महिलांची संख्या असून ४९ टक्के लहान मुले,पुरुषाची संख्या असल्याने जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो. अनेक वर्षापासूनच्या कुष्ठरोग हद्दपार करण्याचे शासनाचे प्रयत्न आजही थांबलेले नसले तरी रुग्ण बरा झाला तरी त्या रुग्णाला कुष्ठरोगी म्हणूनच मरण पत्करावे लागत असल्याचे शल्य त्याच्यासह कुटुंबाला भोगावे लागते.