शिवजयंती निमित्ताने मनसे दिवा शहर आयोजित चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न
दिवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहर आणि कलारंग चित्रकला यांच्या संयुक्त विद्यमानाने या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दिव्यातील विविध भागातील १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
छत्रपती शिवरायांच्या जीवन प्रसंगांवर आधारीत किंवा शिवरायांशी संबंधित चित्र काढून अनोखी मानवंदना देण्याचा उपक्रम मनसेकडून राबविण्यात आला. दिव्यातील एस. एम.जी शाळेमध्ये ही स्पर्धा पार पडली,ज्यात मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेतील काही निवडक चित्रांचे प्रदर्शन आणि बक्षीस वितरण येत्या १० मार्च रोजी तिथीप्रमाणे साजऱ्या शिवजयंती उत्सवात करण्यात येणार असल्याचे मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी सांगितले.
जाहिरात :