पै. सिकंदर शेखला यावर्षीचा महाराष्ट्र केसरी किताब, गतविजेता शिवराज राक्षेला एका मिनिटात किलं चितपट…

Spread the love

महाराष्ट्र केसरी किताब यावर्षी पैलवान सिकंदर शेख यांनी पटकावला असून गतवर्षीचा विजेता असलेला शिवराज राक्षे यावर्षी उपविजेता झालेला आहे. गतविजेता महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांच्यात अंतिम कुस्तीचा सामना रंगला होता.

पुणे /जनशक्तीचा दबाव- पुण्यातील फुलगाव येथे भरलेल्या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब यावर्षी पैलवान सिकंदर शेख यांनी पटकावला असून गतवर्षीचा विजेता असलेला शिवराज राक्षे यावर्षी उपविजेता झालेला आहे. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांच्यात अंतिम कुस्तीचा सामना रंगला होता. अवघ्या एक मिनिटांमध्ये सिकंदर शेख ही कुस्ती जिंकली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या संधी गेली होती, यावर यावर्षी मात्र महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे.

जुन्या वादाची आठवण गेल्या वर्षी पुण्यातच कोथरूडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू झाली होती, त्यावेळी सिकंदर शेख याला काका पवार यांच्या तालमीतील महेंद्र गायकवाड याने सेमी फायनल मध्ये पराभव केला होतं. सिकंदर शेख याने या निर्णयावर आक्षेप घेऊन मला पंचानी कमी गुण दिले आहेत असा आरोप केला होता. त्यानंतर मोठा कुस्तीचा वाद महाराष्ट्रात पाहायला मिळाला. यात धार्मिक वाद सुद्धा पुढे चर्चेला आला होता.

या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी कोण होणार याची उत्सुकता लागली होती. सिकंदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याचा रहिवाशी असून तो कुस्तीचा सराव आणि कुस्ती प्रशिक्षण हे कोल्हापूर मधील प्रसिद्ध अशा गंगावेस तालीम मध्ये करतो. यावर्षी मानाच्या महाराष्ट्र केसरी ला गाडी आणि मानाची गदा बक्षीस देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष रामदास तडस यांच्या हस्ते हे बक्षीस देण्यात आलं.

महाराष्ट्रात आणि कुस्तीची मोठी परंपरा आहे. त्यातच कोल्हापूर हे कुस्तीगिरांसाठी जगप्रसिद्ध आहे. येथे राज्यच नाही तर देशभरातून पैलवान तयारी करण्यासाठी येतात. शाहू महाराजांच्यापासून ही कुस्तीची परंपरा अधिकच उजळून निघाली आहे. त्यातच सिकंदर शेख यानेही कोल्हापुरात कुस्तीचे धडे गिरवले आणि त्याचा मागीलवर्षी मान गेला होता. मात्र यावर्षी सिकंदरने कसर भरुन काढली आहे. यावर्षी सिकंदरने महाराष्ट्र केसरी किताब जिंकला आहे. त्यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तसंच अभिनंदनाचा वर्षाव सिकंदर शेखवर होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page