प्रा.विसुभाऊ बापट यांच्याहस्ते सायन येथे हा पुरस्कार लोटणकर यांना होणार प्रदान
मुंबई (शांताराम गुडेकर )
कवी अशोक लोटणकर यांच्या "अक्षरनामा" या काव्यसंग्रहास शिवानी पब्लिकेशन, मुंबई यांचा प्रथम श्रेणीचा पद्मश्री नारायण सुर्वे राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे.रोख रक्कम,सन्मानचिन्ह, सन्मान पत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून रविवार दि.३० एप्रिल २०२३ रोजी सायन, मुंबई येथे कुटुंब रंगलय काव्यात चे सर्वेसर्वा प्रा.विसुभाऊ बापट यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.अक्षरनामा हे लोटणकर यांचे २० वे पुस्तक असून त्यांनी कथा, लघुकथा, कविता, ललितगद्य, बाल वाङमय, आस्वादक समीक्षा आणि अंध मुलांसाठी ब्रेललिपी इ.स्वरूपाचे साहित्य प्रकाशित झालेले आहे.त्यांच्या साहित्यकृतींना कवी कुसुमाग्रज पुरस्कारांसह कोमसाप आणि नामवंत साहित्य संस्थांचे, सामाजिक संस्थांचे २५ हून अधिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
लोटणकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा या गावचे असून गेल्या वर्षी त्यांनी लांजा-प्रभानवल्ली येथील सातव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले आहे. मुंबईतल्या बीईएसटी मधून आगार व्यवस्थापक या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. ते अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित आहेत.लोटणकर यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कोकणातील अनेक मंडळ, सामाजिक संस्था, ग्रामस्थ मंडळ,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वृतपत्रलेखक,बीईएसटी कर्मचारी यांनी त्यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.प्रा.विसुभाऊ बापट यांच्याहस्ते सायन येथे हा पुरस्कार लोटणकर यांना होणार प्रदान