“कब्बड्डी आपला पारंपरिक मैदानी खेळ असून क्रिकेट प्रमाणे युवा पिढीने कबड्डीलादेखील महत्व दिले पाहिजे”.
✒️ जनशक्तीचा दबाव न्यूज
🛑 संगमेश्वर | जानेवारी ३०, २०२३.
◼️ माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून माभळे, ता. संगमेश्वर येथे जिल्हास्तरीय कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन भाजपा नेते, माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
◼️ नवतरुण मित्र मंडळ, माभळे काष्टेवाडी गेली २८ वर्षे माघी गणेशोत्सवाचे मोठ्या उत्साहाने व जल्लोषाने आयोजन करतात. यावर्षी जिल्हास्तरीय कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर इतर सांस्कृतिक कार्यक्रमदेखील होणार आहेत.
उद्घाटनाचा कबड्डीचा सामना नीलकंठेश्वर देवरुख व चिपळूण यांच्यात खेळवण्यात आला.
◼️ या स्पर्धेसाठी माजी आमदार बाळासाहेब माने यांच्यासोबत मिहीर माने, भाजपा दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष हरिभाई पटेल, भाजपा सगेमश्वर महिला तालुका अध्यक्षा कोमल रहाटे, भाजयुमो जिल्हा कोषाध्यक्ष सतीश पटेल, ओबीसी सेलचे निखिल लोध, जिल्हा परिषद माजी सदस्या माधवीताई गीते, दीपिका ताई जोशी, मुग्धा भिडे, उदय करमरकर, गोविंद भिडे, अनिकेत भिडे, इब्राहिम अलजी आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते या स्पर्धेला उपस्थित होते.