
रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी वामनराव जोग यांचे मार्गदर्शन.
▪️ अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळ गोळप यांच्यावतीने रविवार दि. २९ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २:३० ते ६:०० या वेळेत पाटणकर कार्यालय, फिनोलेक्स फाटा, गोळप येथे रंगमंच कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी श्री. वामनराव जोग मार्गदर्शन करणार आहेत.
▪️ कार्यशाळा विनामूल्य असून कार्यशाळेत वय वर्षे १० च्या पुढील कोणीही व्यक्ती सहभागी होऊ शकतात. पूर्वनोंदणी २७ जानेवारी २०२३ पर्यंत करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ९४२२३७२२१२, ९९३०५४६८६८, ९९७०५६५६२४ या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.