कवी/शाहीर उमेश पोटले विरूद्ध गायक/शाहीर रविंद्र भेरे अशी पाहण्यासारखी कलगी – तुरा जुगलबंदी
मुंबई ( दिपक कारकर /शांताराम गुडेकर )
रायगड जिल्हा म्हसळा तालुक्यात चिचोंडे/गायरोणे या गावी वडिलोपार्जित श्री काळभैरव मंदिर असून मंदिरात महादेवाची देखील स्थापना आहे. येथील ग्रामस्थ व भाविकांना हे जागृत देवस्थान असल्याचे अनेकांना प्रचीती येत असते,या गावातील सर्पदंश झालेल्या व्यक्ती या मंदिरातच बरे होतात अगदी कोणततेही वैद्यकीय उपचार न घेता हा येथील आज पर्यंतचा इतिहास आहे.चैत्र पौर्णिमा होळी आणि महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो, अनेक भाविकांच्या नवसाला पावतो अशी देव श्री काळभैरव प्रति भाविकांची अपार श्रध्दा आहे.
मंदिराच्या भोवताली सुंदर निसर्ग आहे.नदीकाठी हे मंदिर अधिक शोभून दिसते, मात्र बदलत्या युगानुसार आता मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले आहे. सदर मंदिराचे नूतनीकरण काम सुरू देखील आहे.आणि म्हणूनच एक सामाजिक सौख्य राखणारा उपक्रम हाती घेत "शक्ती - तुरा" जरी करमणुकीचा कार्यक्रम असला,कोकणची लोकधारा असली तरी अशा आयोजनातून समाज बांधवांना एकत्रित करण्याचा प्रयत्न,एकात्मतेतून गावची उन्नती साधण्यासाठी ही संकल्पना निश्चितच मोठे योगदान ठरेल, रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मु. चिचोंडे /आदिवासी वाडी/बौद्धवाडी/ गायरोणे गावचं प्रसिद्ध "श्री काळभैरव मंदिर" उपरोक्त मंदिराच्या जिर्णोद्धार निधि-संकलन करिता कलगी- तुऱ्याचा जंगी सामना रविवार दि.२० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९:३० वाजता दामोदर नाट्यगृह परेल- मुबंई येथे लेखणीचे जादूगार शक्तिवाले शाहिर उमेश पोटले आणि स्वर साम्राट तुरेवाले शाहिर रवींद्र भेरे सह राजेंद्र टाकळे यांच्यात हा कलगी-तुरा (जुगलबंदी) सामना रंगणार आहे. तरी उपरोक्त मंदिर जीर्णोद्धार संकलन निधिकरिता आयोजित कार्यक्रमाला कलाप्रेमी रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आम्हास उपकृत करावे,अधिक माहितीसाठी उमेश पोटले-९२२१३५३१७७ यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन उपरोक्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.