
विले पार्ले : प्रतिनिधी (अजित गोरुले)
कुणबी सेना मुंबई प्रदेशच्या वतीने कुणबी संमेलन आणि आरक्षण निर्धार परिषदेचे आयोजन दि. २६ फेब्रुवारी सकाळी १० वा विलेपार्ले पूर्व येथे मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात करण्यात आले आहे.
मुंबई-ठाणे-पालघर-कोकण-विदर्भ येथे कुणबी समाज मोठ्या संख्येने वास्तव्य करीत असून या समाजात जनजागृती करण्यासाठी ह्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.कुणबी सेनाप्रमुख श्री.विश्वनाथ पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
सर्व समाज बंधू भगिनींनी या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहान संस्थेचे मुंबई अध्यक्ष प्रकाश बारे आणि सरचिटणीस चंद्रकांत कुळ्ये यांनी केले आहे.
जाहिरात :

