
दिवा (प्रतिनिधी) संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ,दिवा शहर आयोजित विश्वरत्न,भारतरत्न,महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमीत्त 14 एप्रिल 2023 रोजी दिव्यात भव्यदिव्य अशी रॅली काढण्यात येणार असून यानिमीत्त दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सदरची मिरवणुक जय भीम स्तंभ-साबे रोड दिवा स्टेशन येथून सुरुवात होणार असून मुंब्रादेवी कालनी रोड,दातिवली रोड,ग्लोबल स्कूल,दातिवली तलाव,सम्यक बुद्ध विहार,गणेश नगर येथून वळून बी.आर.नगर मार्गे सिद्धार्थ बुद्ध विहार येथे सांगता होणार आहे.
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री,भारतीय संविधानाचे शिल्पकार,भारतीय न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,राजनीतीतज्ञ,तत्वज्ञ,समाजसुधारक,पत्रकार,वकील,दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डा.बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल 2023 रोजी 132 वी जयंती दिव्यात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.समाजासाठी असिम त्याग करणारे,दलित समाजाला हक्क मिळवून देणारे,महाडचा सत्याग्रह,महिलांच्या प्रगतीसाठी पुढाकार अशी कित्येक कार्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.त्यांनी समाजासाठी आपले आयुष्य खर्ची घातले.शिक्षणासाठी ,समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला.शिका,संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा गुरुमंत्र दिला.असे असामान्य कर्तृत्व गाजविणाऱ्या डा.बाबासाहेब आंबेडकर यांची भव्यदिव्य अशी रॅली निघत आहे.
यानिमीत्त दि.14 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता धम्म विधी कार्यक्रम,बुद्ध वंदना व पुजा पाठ तसेच सायंकाळी 4 वा.तथागत गौतम बुद्ध,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक निघणार आहे.यानिमित्त दिव्यातीलच नाही तर भारतातील प्रत्येक नागरिकांनी आपला सहभाग घ्यावा असे आवाहन संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ दिवा शहरातर्फे करण्यात आले आहे.