स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | मे ०६, २०२३.

पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आणि विवेक व्यासपीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहाचे आयोजन येत्या २१ ते २८ मे २०२३ दरम्यान केले आहे. या अंतर्गत जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन सोमवार दि. २२ मे रोजी सकाळी ११ वाजता ऐतिहासिक पतितपावन मंदिरात केले आहे. स्पर्धा खुल्या गटासाठी होणार आहे.

स्वा.सावरकर यांच्या जीवन प्रसंगावर रांगोळी काढायची आहे. यामध्ये प्रथम क्रमांक रू. ५०००, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांक रू. ३००० व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक २०००, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी रु. १००० सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. २२ मे २०२३ वेळ: सकाळी ११.०० वाजता स्पर्धेला सुरवात होईल.

परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. रांगोळी काढण्यासाठी लागणारा वेळ, रांगोळीसाठी जागा स्पर्धेवेळी सांगण्यात येईल. स्पर्धकांनी आपली नावे देण्याची अंतिम तारीख १८ मे पर्यंत राहिल. स्पर्धकांनी आपली नावे संपर्क कमिटीकडे वेळेत द्यावीत. बक्षीस वितरण समारंभ २८ मे रोजी सकाळी ११.०० वा. पतितपावन मंदिर, रत्नागिरी या ठिकाणी होईल. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी सौ. अनघा निकम – मगदूम, मोबा. ९४२२३७१९०७ आणि मंगेश मोभारकर मोबा. ८७६६४३२८६४ यांच्या संपर्क साधावा, असे आवाहन विवेक व्यासपीठतर्फे करण्यात आले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page