भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर ‘हिंदु राष्ट्रा’शिवाय पर्याय नाही !
– श्री. सतीश कोचरेकर, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
*मुंबई* - गोवा येथे गेल्या 11 वर्षांपासून होणार्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे हिंदु राष्ट्राची चर्चा आता केवळ भारतातच नाही, तर वैश्विक पातळीवर प्रारंभ झाली आहे. यामध्ये आता हिंदु राष्ट्राची मागणी करणारी अनेक व्यासपिठे निर्माण झाली आहेत; मात्र दुसरीकडे देशात इस्लामिक स्टेटच्या समर्थकांना मोठ्या प्रमाणात अटक होत आहे. पंजाबमध्ये खलिस्तानवादी पोलीस-प्रशासनाला आव्हान देत आहेत, हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या करत आहेत; तर मणिपूर, नागालँड यांसारख्या राज्यांतील हिंदूंची घरे जळत आहेत. काश्मीरमधून कलम 370 हटवले गेले, तरी तेथील हिंदू सुरक्षित झालेला नाही. देशभरात साक्षी, अनुराधा, श्रद्धा वालकर यांसारख्या असंख्य हिंदू मुलींच्या ‘लव्ह जिहादीं’कडून होणार्या निर्घृण हत्या पाहता देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे, असे दिसते. ‘दी केरला स्टोरी’ या चित्रपटाने मांडलेले वास्तव केवळ ‘केरळ’ राज्यापुरते मर्यादित नसून या जिहादी षड्यंत्राची व्याप्ती देशभरात मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे. एकीकडे हिंदूंनी भाषण केले की, लगेचच त्यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा दाखल केला जातो; मात्र ‘सर तन से जुदा’ करण्याच्या उघड घोषणा देणार्यांवर कारवाई होतांना दिसत नाही. दुसरीकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘आय.एस्.आय.एस्.’ हे भारताला वर्ष 2047 पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र रचत असल्याचे उघड झाले आहे. अशा स्थितीत हिंदु धर्म हा एकमात्र धर्म आहे की, जो समाजाला जोडू शकतो, तो विश्वबंधुत्वाची आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ची संकल्पना मांडू शकतो. त्यामुळे भारताचे पुन्हा तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर भारताला आदर्श रामराज्य अर्थात् हिंदु राष्ट्र बनवण्याशिवाय पर्याय नाही; म्हणूनच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे 16 ते 22 जून 2023 या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, असे *हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर* यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मेढे (वसई) येथील परशुराम तपोवन आश्रमाचे संस्थापक भार्गवश्री बी.पी.सचिनवाला, केरलीय क्षेत्र परिपालन समितीचे आचार्य श्री.पी.पी.एम.नायर, सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर, हिंदू गोवंश रक्षा समितीचे समन्वयक श्री. दिप्तेश पाटील हेही उपस्थित होते.
*या वेळी सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर म्हणाल्या की,* ‘यंदाच्या अधिवेशनामध्ये ‘हिंदु राष्ट्र संसद’ या वैशिष्ट्यपूर्ण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विषयांवरील तज्ञ मंडळींचे परिसंवाद, तसेच विशेष कार्य करणार्या मान्यवरांच्या मुलाखती हेही यंदाच्या अधिवेशनाचे विशेष आकर्षण असणार आहे. ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल सर्टीफिकेशन’, ‘लँड जिहाद’, ‘काशी-मथुरा मुक्ती’, ‘धर्मांतर’, ‘गोहत्या’, ‘गड-किल्ल्यांवरील इस्लामी अतिक्रमणे’, ‘मंदिर संस्कृतीचे रक्षण’, ‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’, ‘पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचार’ यांसारख्या विविध विषयांसोबतच हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीसाठी आवश्यक विषयांवर या महोत्सवामध्ये विचारमंथन होणार आहे’. *परशुराम तपोवन आश्रमाचे संस्थापक भार्गवश्री बी.पी.सचिनवाला* यांनी वेदांचा अभ्यास करून संस्कृतीरक्षणाचे तसेच समाजातील दुष्प्रवृत्तींविरोधात संघटितपणे प्रतिकार करण्याचे आवाहन केले. *केरलीय क्षेत्रपरिपालन समितीचे आचार्य श्री.पी.पी.एम.नायर* यावेळी म्हणाले, ‘देशात विविध प्रकारचे जिहाद, हिंदूंचे धर्मांतरण सुरू आहे, हे थांबविण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे. ‘गोरक्षणाचे कार्य करण्यासोबत राष्ट्र आणि धर्मरक्षणाचे कार्य करण्याची प्रेरणा प्रतिवर्षी होणार्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामुळे मिळाली’, असे *हिंदू गोवंश रक्षा समितीचे समन्वयक श्री. दिप्तेश पाटील* यांनी याप्रसंगी सांगितले.
*हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर पुढे म्हणाले की,* या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, इंडोनेशिया, सिंगापूर, बेल्जियम, बांग्लादेश आणि नेपाळ या देशांसह भारतातील 28 राज्यांतील 350 हून अधिक हिंदु संघटनांच्या 1500 हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने अमरावती येथील ‘श्री रुक्मिणी वल्लभ पिठा’चे अनंत विभूषित श्री जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी रामराजेश्वराचार्यजी सरकारजी, ‘विश्व हिंदु परिषदे’चे देवगिरी प्रांताचे संपर्कप्रमुख धर्माचार्य ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, त्रिपुरा येथील ‘शांती काली आश्रमा’चे स्वामी चित्तरंजन महाराज, छत्तीसगढ येथील ‘शदाणी दरबार’चे प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, छत्तीसगड येथील ‘श्री जामडी पाटेश्वरधाम सेवा संस्थान’चे संचालक श्रीरामबालकदास महात्यागी महाराज, गोंदिया येथील ‘महात्यागी सेवा संस्थान’चे अध्यक्ष पू. महंत श्रीरामज्ञानीदास महात्यागी महाराज आदी संतांची वंदनीय उपस्थितीही या अधिवेशनाला लाभणार आहे.
याशिवाय प्रामुख्याने काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीलन लढा देणारे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे राष्ट्रीय प्रवक्ते अधिवक्ता विष्णु शंकर जैन, तेलंगाणा येथील हिंदुत्वनिष्ट आमदार टी. राजासिंह, माजी आमदार तथा ‘हिंदु इकोसिस्टिम’चे संस्थापक श्री. कपिल मिश्रा यांच्यासह वरीष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर, सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता सुभाष झा, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, पितांबरी उद्योगसमूहाचे संचालक श्री. रविंद्र प्रभुदेसाई, सुप्रसिध्द लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर आदी मान्यवरांसह मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधीही या महोत्सवाला उपस्थित रहाणार आहेत.
या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच समितीच्या ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल आणि facebook.com/hjshindi1 या फेसबुक द्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले.
आपला विनीत,
श्री. रमेश शिंदे,
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,
(संपर्क क्रमांक : 99879 66666)