केंद्र सरकारने कर्मचारी निवड आयोगामध्ये ( SSC – Staff Selection Commission) मोठी भरती जाहीर केली असून सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवी धारक युवकांसाठी ही मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
देशात तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगरीचे संकट उभे राहिले असताना आता केंद्र सरकारने तरुणांना एक खुशखबर दिली आहे. केंद्र सरकारने कर्मचारी निवड आयोगामध्ये ( SSC – Staff Selection Commission) मोठी भरती जाहीर केली असून सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवी धारक युवकांसाठी ही मोठी संधी उपलब्ध होणार आहे. याबाबत SSC ने अधिसूचना जारी केली असून ट्रान्सलेटर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
कर्मचारी निवड आयोगाद्वारे वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून पदव्युत्तर आणि पदवीधारक तरुणांसाठी ही संधी उपलब्ध असेल. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, कार्यालये, संस्था तसेच इतर विभागांमध्ये ग्रुप – बी (नॉन-गॅझेटेड पदांकरिता ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये, ज्युनिअर ट्रान्सलेटर, ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर तसेच सीनियर हिंदी ट्रान्सलेटर या पदांकरीत भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. वरील रिक्त पदांच्या एकूण 307 जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाईल. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात असून 12 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवार भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
केंद्र सरकारच्या या विभागांमध्ये होणार भरती-
सेंट्रल सेक्रेटरिएट ऑफिशियल लँग्वेज सव्र्हिस (CSOLS) – जॉईनिंग ज्युनियर ट्रान्सलेटर
रेल्वे बोर्ड – ज्युनियर ट्रान्सलेटर
आर्मड फोर्सेस हेडक्वार्टर्स (AFHQ) – ज्युनियर ट्रान्सलेटर
केंद्र सरकारचे सबऑर्डिनेट ऑफिस – ज्युनियर ट्रान्सलेटर/ ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर
केंद्र सरकारची विविध मंत्रालये/ खाती/ कार्यालये – सिनियर हिंदी ट्रान्सलेटर
या भरती प्रक्रियेतील अर्जाचे शुल्क 100 रुपये असून महिला/ अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ पीडब्ल्यूडी यासाठी कोणतेही शुल्क आकरले जाणार नाही. याशिवाय, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, पणजी इ.या ठिकाणांवर परीक्षा केंद्रे असतील.