
रत्नागिरी: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. या बदली प्रक्रियेस आता गती आली असून, बदली पात्र शिक्षकांची यादी शिक्षणाधिकारी यांनी प्रसिद्ध केली आहे. बदलीसाठी इच्छुक शिक्षकांना दिला आहे. पहिल्या टप्प्यात संवर्ग एक मधून 95 जणांच्या बदल्या झाल्या आहेत.
ग्रामविकास विभागाने पत्र काढून पुढील चार दिवसांत गटशिक्षणाधिकारी यांनी रिक्त पदे बदली पोर्टलवर भरावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडून जिल्हांतर्गत बदली पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

या बदली पात्र शिक्षकांमध्ये विशेष संवर्ग एक व विशेष संवर्ग -दोन या शिक्षकांचा देखील समावेश करण्यात आला आहे. ही बदली पात्र शिक्षकांची यादी व्हिनस कंपनीने ग्राम विकास विभागाकडून बदली पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. मागील दोन वर्षापासून शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबवली न गेल्याने यावर्षी बदली पात्र शिक्षकांची संख्या वाढली होती. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया तातडीने राबवण्यासाठी शिक्षकांच्या विविध शिक्षक संघटनांनी ग्रामविकास विभागकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. आंतरजिल्हा आपसी बदली झालेल्या शिक्षकांनी त्यांची पूर्वीच्या जिल्ह्यातील मूळ सेवा बदली ग्राह्य धरावी म्हणून न्यायलयात धाव घेतली होती. न्यायालयाने यासाठी बदली प्रक्रियेला स्थगिती दिली होती. पहिल्या टप्प्यात संवर्ग 1 च्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील 95 जणांच्या बदल्या झाल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या वैध आधारावर संचमान्यता…
ग्रामविकास विभागाच्या बदली शासन निर्णयानुसार शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ही 31 मे पूर्वी होणे अपेक्षित होते. मात्र विविध जिल्ह्यातील शिक्षकांनी बदली प्रक्रियेला आक्षेप घेऊन न्यायालयात दाद मागितली होती. त्यातच संचमान्यता हा कळीचा मुद्दा असून नवीन संचमान्यता शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या वैध आधारावर संचमान्यता करण्यात आली. यामुळे राज्यात जवळपास 25 हजार शिक्षक अतिरिक्त झाल्याने खळबळ उडाली होती.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
